शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला शासनाचे ५७० कोटी

By admin | Updated: July 19, 2014 02:27 IST

राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) शासनाकडून देय असलेल्या रकमेपैकी ५०० कोटी तातडीने उपलब्ध

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) शासनाकडून देय असलेल्या रकमेपैकी ५०० कोटी तातडीने उपलब्ध करु न देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत दिले. याशिवाय मानव विकास योजनेंतर्गत देय असलेले ७० कोटी रु पये देखील या महामंडळाला देण्यात येणार आहेत.एसटी महामंडळाकडून आकारण्यात येणारा ग्रामीण सेवेवरील प्रवासी कर १७.५० टक्क्यांवरु न १० टक्के इतका कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णयही बैठकीत घेण्यात आला. या १० टक्क्यांपैकी पाच टक्के रक्कम महामंडळाला, तर पाच टक्के रक्कम शासनाला मिळणार आहे. या निधीचा उपयोग एसटी सेवेची आर्थिक स्थिती सुधारण्याबरोबरच प्रवासी सेवेत सुधारणा करण्यासाठी होणार आहे. राज्य शासन आणि रस्ते महामंडळाच्या रस्त्यांवर एसटीला टोल माफ केला आहे. तसाच तो राष्ट्रीय महामार्गांवरदेखील माफ करावा, अशी विनंती केंद्र सरकारला केली जाईल, असे पवार म्हणाले. बैठकीला मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित या बैठकीला महामंडळाचे अध्यक्ष जीवन गोरे, परिवहन विभागाचे प्रधान सचिव एस. के. शर्मा आदी उपस्थित होते. महामंडळाने बसगाड्यांची दुरुस्ती व देखभाल, आगारांची सुधारणा आणि स्वच्छतेवर भर देण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी केल्या.(विशेष प्रतिनिधी)