शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘अमृत’च्या वाट्याचे कडू घोट संपले, ५४ कोटींची तरतूद; ६ कल्याणकारी योजना जाहीर

By यदू जोशी | Updated: December 3, 2023 05:47 IST

काैशल्य विकासाचे प्रशिक्षण. नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयक म्हणून अमृत कार्य करेल. 

मुंबई : शासकीय महामंडळे, संस्थांच्या कोणत्याही योजनांचे लाभार्थी नसलेल्या ब्राह्मण समाजासह इतर समाजांमधील आर्थिकदृष्ट्या कमकुवत व्यक्तींच्या कल्याणासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या अमृत संस्थेच्या नशिबी आतापर्यंत आलेले कडू घोट अखेर संपले आहेत. अमृत संस्थेच्या माध्यमातून सहा कल्याणकारी योजनांची घोषणा करण्यात आली असून ५४ कोटी रुपयांची तरतूददेखील करण्यात आली आहे. 

‘अमृत’चे (महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी) व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी सहा महिन्यांपूर्वी पदभार सांभाळल्यानंतर अमृतकडून लोकांच्या अपेक्षा काय आहेत ते जाणून घेतल्यानंतर सहा योजनांची घोषणा करण्यात आली.  पुणे येथील मुख्यालयासाठी राज्य सरकारने १७ पदे मंजूर केली असून विविध जिल्ह्यांसाठी ८५ पदे मंजूर करण्यात आली आहेत.

स्पर्धा परीक्षार्थ्यांना मिळणार अर्थसाहाय्य

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी १५ हजार रुपये; तसेच मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना मुलाखतीच्या तयारीसाठी २५ हजार रुपये अर्थसाहाय्य देणार.

संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा मुख्य परीक्षा/ मुलाखतीच्या तयारीसाठी उमेदवारांना अर्थसाहाय्य. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण होतील, त्यांना मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी ५० हजार रुपये;  मुख्य परीक्षा उत्तीर्ण होतील, त्यांना मुलाखतीच्या तयारीसाठी २५ हजार रुपये अर्थसाहाय्य.

काैशल्य विकासाचे प्रशिक्षण. नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी समन्वयक म्हणून अमृत कार्य करेल. 

व्यावसायिक/ उद्योजक घडविण्यासाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन सर्वंकष प्रशिक्षण देणार.  बँकांशी समन्वय साधून कर्जे उपलब्ध करून देण्यासाठी मार्गदर्शन व साहाय्य देणार.

कृषी आधारित एमएसएमई किंवा कुटीर उद्योगांची स्थापना आणि व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणार, कर्ज देणार. 

एम्स, आयआयएम, आयटीच्या विद्यार्थ्यांना दरमहा १० हजार रुपये अर्थसाहाय्य देणार.

टॅग्स :State Governmentराज्य सरकार