रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याचे जतन, संवर्धन आणि संरक्षणासाठी ५०० कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे केली. तीन वर्षांत काम पूर्ण करण्याची ग्वाहीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिली.रायगडसह इतर गडकोट-किल्ल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी शासन घेईल, त्यासाठी शासनाची तिजोरी सदैव खुली राहील. त्यासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मार्गदर्शक म्हणून पाठीशी राहावे, असे आवाहनही त्यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्यात केले. >शासन मराठा आरक्षणाच्या बाजूनेच आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. आरक्षणासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या नेतृत्वाखाली हजारो पुरावे गोळा केले आहेत. कायदेशीर लढाई जिंकून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे. - मुख्यमंत्री
रायगडच्या संवर्धनासाठी ५०० कोटी - मुख्यमंत्री
By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST