शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हाणामारी करणा-यांना ५ वर्षे समाजकार्याची शिक्षा; लेखी हमीपत्राच्या अटीवर अर्ज मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 01:46 IST

किरकोळ कारणावरून हाणामारी करणा-या उभय पक्षांनी पुढील पाच वर्षांपर्यंत ग्रामपंचायतीमार्फत गावात राबविल्या जाणा-या स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, साक्षरता अभियान आदी समाजकार्यांत पुढाकार घेऊन कामे करावीत.

औरंगाबाद : किरकोळ कारणावरून हाणामारी करणा-या उभय पक्षांनी पुढील पाच वर्षांपर्यंत ग्रामपंचायतीमार्फत गावात राबविल्या जाणा-या स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, साक्षरता अभियान आदी समाजकार्यांत पुढाकार घेऊन कामे करावीत. तशी कामे केल्याचे सरपंचांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दर महिन्याला तलाठ्याकडे सादर करावे. तसेच उभय पक्षातील सात जणांनी प्रत्येकी एक हजार रुपये शास्ती (कॉस्ट) म्हणून खंडपीठातील विधिसेवा उपसमितीकडे जमा करावेत, असे आदेश न्या. प्रसन्न बी. वराळे आणि न्या. विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठाने दिले.बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील चांदापूर ग्रामपंचायत निवडणुकीत परस्पर विरोधी पॅनल उभे करण्याच्या कारणावरून श्रीहरी गीते आणि कल्याण गीते यांच्या गटाने (भाऊबंदांनी) परस्परांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केले होते. दोन्ही पक्षांविरुद्ध गंभीर दुखापत करणे, मारहाण, मुंबई पोलीस कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते, तर कल्याण गीते गटाविरुद्ध ‘अ‍ॅट्रॉसिटी’ कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता.लेखी हमीपत्राच्या अटीवर अर्ज मंजूरगावात शांतता नांदावी, कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उपस्थित होऊ नये, त्याचप्रमाणे उभयपक्षातील वैमनस्य कायमचे संपुष्टात यावे यासाठी गावातील प्रतिष्ठितांनी पुढाकार घेऊन उभयपक्षामध्ये तडजोड घडवून आणली व त्यांनी परस्परांविरुद्धच्या तक्रारी मागे घेण्यासाठी त्यांचे मन वळवले. त्यावरून उभयपक्षांनी परस्परांविरुद्धच्या तक्रारी मागे घेण्यासाठी खंडपीठात अर्ज केले होते. पाच वर्षांपर्यंत समाजकार्य करण्याचे लेखी हमीपत्र देण्याच्या अटीवर खंडपीठाने उभयपक्षांचे अर्ज मंजूर केले.

टॅग्स :Courtन्यायालय