शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

४७ मपोसे अधिकाऱ्यांची विवरणपत्रे प्रलंबित

By admin | Updated: April 4, 2017 06:01 IST

महाराष्ट्र पोलीस सेवेतील उपायुक्त, अधीक्षक, अपर अधीक्षक अशा ४७ अधिकाऱ्यांनी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या आर्थिक वर्षातील विवरणपत्रे अद्याप सादर केलेली नाही.

जमीर काझी,मुंबई- महाराष्ट्र पोलीस सेवेतील उपायुक्त, अधीक्षक, अपर अधीक्षक अशा ४७ अधिकाऱ्यांनी १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१६ या आर्थिक वर्षातील विवरणपत्रे अद्याप सादर केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या पूर्वीच्या मालमत्तेत किती वाढ अथवा घट झाली, याची माहिती सरकारकडे उपलब्ध नाही.या ४७ अधिकाऱ्यांना ७ दिवसांमध्ये मालमत्ता व दायित्वाची विवरणपत्र विहित नमून्यात सादर करावयाची आहेत, अन्यथा त्यांच्यावर संबंधित घटकप्रमुखांनी शिस्तभंगविषयक कारवाई करावी, अशी सूचना पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी केली आहे.प्रत्येक शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांवर प्रतिवर्षी आर्थिक वर्षाअखेरपर्यंतची त्यांची स्थावर व जंगम मालमत्ता आणि दायित्वाबाबतची माहिती देण्याचे बंधन आहे. प्रत्येक वर्षाच्या ३१ मेपर्यंत त्याबाबतचा तपशील विहित नमुन्यामध्ये कार्यरत असलेल्या विभागाच्या प्रमुखामार्फत शासनाकडे सादर करावयाचा असतो. मात्र, मपोसे असलेल्या ४७ अधिकाऱ्यांनी त्याबाबत सूचना देऊनही, आपली संपत्ती व कर्जाबद्दलचा तपशील जमा केलेला नाही. २०१६-१७ हे आर्थिक वर्ष संपले, तरी पूर्वीची माहिती अद्याप सादर न केल्याने पोलीस महासंचालकांनी त्यांना अखेरची मुुदत दिली आहे. ७ दिवसांमध्ये त्यासंबंधी माहिती न दिल्यास त्यांची ही गैरवर्तणूक समजली जाईल. त्यानुसार, संबंधित अधिकाऱ्यांवर ते कार्यरत असलेल्या घटकप्रमुखांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई करावी, असे निर्देश दिले असल्याचे मुख्यालयातील सूत्रांकडून सांगण्यात आले.>संबंधित अधिकारी ए. एच. साळवे (महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधार कंपनी), डी. आर. कुलकर्णी (तांत्रिक विभाग, एटीएस), व्ही. डी. पांढरे ( राज्य सुरक्षा महामंडळ), नितीन पवार वाहतूक, नवी मुंबई), मनोज लोहार (राज्य सुरक्षा महामंडळ), सुनील भारद्वाज (परिमंडळ-४, ठाणे ), डी. पी. प्रधान ( रागुवि, मुंबई), शीला साईल (विशेष कृती दलाचे स्टाफ अधिकारी), एस. एस. बुरसे (क्राइम ब्रॅच, मुंबई), एस. व्ही. साळुंके-ठाकरे (बंदर परिमंडळ, मुंबई), नम्रता पाटील-चव्हाण (एनआयए, मुंबई), पराग मानेरे (सीआयडी,ठाणे शहर), निकेश खाटमोडे (टी.सी.एटीएस), संदीप भाजीभाकरे (आर्थिक गुन्हे शाखा, ठाणे शहर), संदीप जाधव (रागुवि, मुंबई), दीपक देवराज (पश्चिम रेल्वे, मुंबई), सुनील लोखंडे (परिमंडळ-५, ठाणे शहर), भगवान यशोद (पालघर), किरणकुमार चव्हाण (परिमंडळ-१२, मुंबई), प्रशांत खैरे (परिमंडळ -१, नवी मुंबई), गीता चव्हाण (एटीएस, मुंबई),एस. एस. घार्गे (ट्रेनिंग स्कूल, मरोळ) आदी.