शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नगरात ४७ लाखांचा घोटाळा दडपला

By admin | Updated: August 27, 2016 04:55 IST

जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील ४७ लाख रुपयांचा घोटाळा तत्कालीन अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी दडपल्याचे उघडकीस आले आहे.

मिलिंदकुमार साळवे,

अहमदनगर- येथील जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील ४७ लाख रुपयांचा घोटाळा तत्कालीन अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी दडपल्याचे उघडकीस आले आहे. बँकेच्या सभासदांना घोटाळ्याची खबरही लागू देण्यात आली नाही. विशेष म्हणजे बँकेच्या प्रशासनाने घोटाळ्याची फिर्यादही पोलिसात दिली नाही. घोटाळ्यावर शिक्कामोर्तब करणारा चौकशी अहवाल ‘लोकमत’च्या हाती लागला आहे. बँकेच्या कोपरगाव शाखेत ३ आॅक्टोबर २०१५ रोजी ४७ लाख ८ हजार ४८९ रुपयांचा अपहार झाल्याचे बँकेच्या अंतर्गत तपासणीत आढळून आले आहे. ३१ मार्च २०१६ अखेर २०१५-१६च्या आर्थिक कामकाजाची अंतर्गत तपासणी करण्यात आली. बँकेचे वरिष्ठ अधिकारी, शाखा व्यवस्थापक यांनी पुरविलेले दप्तर, माहिती व दिलेल्या तोंडी खुलाशातून हा घोटाळा उघडकीस आला आहे. २०१५-१६च्या तपासणीत प्राथमिक शिक्षक बँकेच्या कोपरगाव येथील शाखेत ४७ लाख ८ हजार ४८९ रुपयांचा अपहार बँकेच्या अंतर्गत तपासणीत आढळला. कोपरगाव शाखेचे कॅशिअर संजय सोनवणे यांनीच हा घोटाळा केला . बँकेचे प्राधिकृत चौकशी अधिकारी एन. बी. लहारे यांच्या चौकशी अहवाल निष्कर्षानुसार अपहार सिद्ध झाला आहे.>पैसे भरल्याने फिर्याद दिली नाहीकोपरगाव शाखेतील अपहार उघडकीस आल्यानंतर कॅशिअरला बडतर्फ करण्यात आले आहे. त्याने अपहाराची रक्कम बँकेत भरली आहे. पोलिसात फिर्याद दिल्यास ठेवीदारांमध्ये उलटसुलट चर्चा होण्याची शक्यता असल्याने व बँकेच्या कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी पोलिसात फिर्याद दिली नाही. - अरुण देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षक बँक