शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
4
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
5
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
6
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
7
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
8
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
9
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
10
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
11
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
12
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
13
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
14
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
15
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
16
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
17
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
18
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
19
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
20
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र

मुंबईतील रेल्वे स्थानकांवर सापडली ४,६८६ बालके

By admin | Updated: July 2, 2016 02:30 IST

मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर आणि हद्दीत मोठ्या प्रमाणात १८ वर्षांखालील बालकांचा वावर असतो.

मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांवर आणि हद्दीत मोठ्या प्रमाणात १८ वर्षांखालील बालकांचा वावर असतो. मुंबईचे आकर्षण, पालकांशी न पटणे, मुलांच्या वाढलेल्या अपेक्षा, घरातील बंधने न आवडणे इत्यादी कारणांमुळे लहान मुले घरातून पळून येतात. अशा लहान मुलांचा शोध रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी) आॅपरेशन मुस्कान अंतर्गत गेल्या काही महिन्यांपासून घेतला जात आहे. मध्यंतरी आॅपरेशन मुस्कान थांबल्यानंतर पोलीस महांसचालकांच्या आदेशानंतर पुन्हा अशा प्रकारचे आॅॅपरेशन २0१६ च्या काही महिन्यांत घेण्यात आले. यात जानेवारी, एप्रिल आणि जून महिन्यात रेल्वे पोलिसांनी घेतलेल्या मोहिमेत ४ हजार ६८६ बालके पोलिसांना सापडली आहेत. या बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर काही बालकांना बाल कल्याण समितीसमोर हजर केल्याचे जीआरपीकडून सांगण्यात आले. जानेवारी महिन्यात दोन हजारपेक्षा जास्त बालके आढळली आहेत. (प्रतिनिधी)>जानेवारी महिन्यातील मोहीमफलांटावर मिळून आलेली बालके : मुले - १,४७३, मुली ६२0बालकल्याण समितीसमोर हजर केलेली बालके : मुले - ११६, मुली - १८पालकांच्या ताब्यात दिलेली बालके : मुले - १,३५७, मुली - ६0२एप्रिल महिन्यातील मोहीमफलाटांवर मिळून आलेली बालके : मुले - १,१0६, मुली - ४५३बालकल्याण समितीसमोर हजर केलेली बालके : मुले - ७३, मुली - १३पालकांच्या ताब्यात दिलेली बालके : मुले - १,0३४, मुली - ४३९जून महिन्यातील मोहीमफलाटांवर मिळून आलेली बालके : मुले - ७२१, मुली - ३१३बालकल्याण समितीसमोर हजर केलेली बालके : मुले - ७२, मुली - १६पालकांच्या ताब्यात दिलेली बालके : मुले - ६४९, मुली - २९७