शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

 मुंबईत दहीहंडीच्या थरारात 117 गोविंदा जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2017 21:12 IST

मुंबईमध्ये आज सकाळपासूनच दहीहंडीचा जल्लोष दिसून येत आहे. मात्र या थरारामध्ये उंचच उंच थर रचण्याच्या नादात अनेक गोविंदा जखमी होत आहेत.

मुंबई, दि. 15 -  मुंबईमध्ये आज सकाळपासूनच दहीहंडीचा जल्लोष दिसून येत आहे. मात्र या थरारामध्ये उंचच उंच थर रचण्याच्या नादात अनेक गोविंदा जखमी होत आहेत. आज सकाळपासून दहीहंडीच्या थरथराटात सुमारे 117 हून अधिक गोविंदा जखमी झाले आहेत. त्यापैकी तीन  गोविंदाला जबर मार लागला असून, त्यांना रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.  गोविंदा रे गोपाळा म्हणत आज सकाळपासूनच मुंबईतील गोविंदांनी दहीहंड्या फोडण्यास सुरुवात केली होती. मात्र यादरम्यान काही गोविंदांना दुखापतींनाही सामोरे जावे लागले. संध्याकाळपर्यंतच्या आकडेवारीनुसार एकूण 117 गोविंदा जखमी झाले आहेत. संध्याकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार मुंबईतील नायर रुग्णालयात 12, केईएम रुग्णालयात 21, सायन येथील रुग्णालयात 15, सेंट जॉर्ज रुग्णालयात 1, नायर रुग्णालयात 1, जेजे रुग्णालयात 1 माहात्मा फुले रुग्णालय, विक्रोळी येथे 1, मुलुंडच्या आग्रवाल रुग्णालयात 4, व्ही. एन. देसाई रुग्णालयात 5, कूपर रुग्णालयात7, डॉ. आंबेडकर रुग्णालय, कांदिवली येथे 4, ट्रॉमा केअर गोरेगाव येथे 3 आणि इतर अशा एकूण 117  गोविंदांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यापैकी केईएम, नायर आणि सिद्धार्थ रुग्णालयांमध्ये प्रत्येकी एका  गोविंदावर उपचार सुरू आहेत.   ऐरोली येथे शॉक लागून गोविंदाचा मृत्यू  नवी मुंबईतील ऐरोली येथे शॉक लागून गोविंदाचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे. सुनील चौगुले स्पोर्ट्स असोसिएशनच्या दहीहंडीमध्ये हा अपघात घडला.  जयेश सरले (३०) असे मयत गोविंदाचे नाव आहे. चुनाभट्टी येथील प्रेमनगर गोविंदा पथकाचा तो गोविंदा होता. याप्रकरणी आयोजकांवर गन्हा दाखल केला जानार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानुसर रबाळे पोलिस ठान्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. शिवसेना ज़िल्हा प्रमुख विजय चौगुले या दहीहंडीचे आयोजक आहेत.  यंदा स्वातंत्र्य दिन आणि दहीहंडी उत्सव एकाच दिवशी आल्याने, चाकरमानी मुंबईकरांना थरांचे स्वातंत्र्य अनुभवायला मिळत आहे. देशभरात स्वातंत्र्यदिनाचा उत्साह असताना, गोविंदांचा उत्साहदेखील शिगेला पोहोचला आहे. सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या कचाट्यातून सुटलेला दहीहंडी उत्सव, यंदा जोश-जल्लोषात साजरा करण्यासाठी गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. मागील काही वर्षांत न्यायालयीन निर्बंधांमुळे संभ्रमावस्थेत असलेल्या उत्सवावर भीतीचे सावट दिसून आले. मात्र, यंदा गोविंदा पथके सर्व निर्बंध झुगारून ‘करून दाखविणारच’ या निर्धाराने मैदानात उतरताना दिसत आहेत. उच्च न्यायालयाने बालगोविंदाचे वय कमी करून १८ वरून १४ केले आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशांचे पालन गोविंदा पथके करणार, याकडे पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे.पोलिसांचे सुरक्षा कवच : मुंबई पोलीस दलातील ३५ हजार अधिकारी आणि जवान, शहरातील अतिसंवेदनशील ठिकाणी तैनात आहेत. केंद्रीय व राज्य राखीव बलाच्या १५ तुकड्या, एटीएस, शीघ्रकृती दल तैनात असून अतिरेकी कारवायांच्या शक्यतेतून गुप्तचर तपास यंत्रणाकार्यरत असतील, असे कायदा व सुव्यवस्थाचे प्रमुख सहायुक्त देवेन भारती यांनी सांगितले होते. ड्रोनसह ५ हजार सीसीटीव्हींचा वॉच आहे.