शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय रुग्णालयांत ४५ टक्के औषध तुटवडा, रुग्णालयांवर नाॅन कोविड सेवांचाही वाढतोय ताण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 06:26 IST

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयांमध्ये दैनंदिन वापराची औषधे आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय साहित्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

मुंबई :

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयांमध्ये दैनंदिन वापराची औषधे आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय साहित्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागील काही महिन्यांपासून हा तुटवडा जाणवत असून  राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांमध्ये दैनंदिन वापराची महत्त्वाची औषधे आणि ग्लोव्हज, सिरिंज, इंजेक्शनच्या सुया अशा अत्यावश्यक साहित्य नसल्याची बाब समोर आली आहे. 

शासकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येणारे रुग्ण आर्थिक दुर्बल स्तरातील असतात. पण, औषध आणि इतर अत्यावश्यक तुटवड्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शनची सुई बाहेरून आणा, असे सांगितले जाते. त्यामुळे निवासी डॉक्टरांना नाराजीला सामोरे जावे लागते. ग्लोव्जशिवाय उपचार करताना एचआयव्हीसारख्या आजारांचा धोका असतो, अशी काही निवासी डॉक्टरांनी  दिली. 

औषधसाठा वरिष्ठ स्तरावरून निविदा काढून येत असल्याने या कामात अडथळे येत असल्याचे काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले. डॉक्टरांनी औषधे आणि अत्यावश्यक साधनांशिवाय रुग्णांवर उपचार कसे करायचे? ही परिस्थिती म्हणजे ढाल-तलवारीशिवायच सैन्याने लढाईला जाण्यासारखे आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

शासनाकडून देयके थकीतच शासनाकडून देयके थकीत असल्याने औषध पुरवठादारांनी काही काळ औषध पुरवठा थांबविला. परिणामी, नाॅन कोविड सेवा पूर्ववत होताना, रुग्णालयात गर्दी वाढत असताना सातत्याने बाहेरून औषधे आणावी लागत असल्याने  रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्थानिक पुरवठादारांची १२५ कोटींची देयके थकीत आहेत. शासनाने मार्चअखेरीस अध्यादेश काढला आहे, परंतु अजूनही पूर्तता नाही.- अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड अँड ड्रग लायसन्स फाऊंडेशन

औषधे बाहेरून आणण्याचा मनस्तापपोटदुखीवर आवश्यक इंजेक्शन आणि औषधे उपलब्ध नाहीत. अत्यावश्यक औषधांपैकी डेक्सा, ऐट्रोफिल, डायक्नो, पित्ताच्या त्रासावरील रॅनटॅक ही औषधही उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.- शौनक शहा, रुग्ण

केवळ घोषणासरकार फक्त घोषणा करते. रुग्णालयांत औषधे उपलब्ध नाहीत. औषधे बाहेरून घ्या, असे सांगून सरकारी रुग्णालयांतून रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो,’ असे फैय्याज शेख या रुग्णाने सांगितले.