शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम विदर्भातील ४४२ शाळांना ‘स्व-मुल्यांकना’चे वावडे!

By admin | Updated: April 11, 2017 00:14 IST

शाळा सिद्धी उपक्रम; राज्यातील ५१४२ शाळांची शाळा सिद्धीकडे पाठ.

ब्रह्मनंद जाधव बुलडाणा: शाळांचे स्व-मूल्यांकनाकरिता राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळांमध्ये शाळा सिद्धी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत अमरावती विभागातील ११ हजार ४७ शाळांनी या उपक्रमात सहभाग घेतला असून, ३६३ शाळा प्रगतीपथावर आहेत. मात्र, अद्यापही पश्‍चिम विदर्भातील ४४२ प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शाळा सिद्धी उपक्रमाला सुरुवात झाली नसल्याने या शाळांना स्व-मूल्यांकनाचे वावडे असल्याचे दिसून येत आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्यातील १00 टक्के शाळा समृद्ध व्हाव्यात व शिक्षण हक्क कायदा २00९ ची संपूर्ण अंमलबजावणी व्हावी, याची काळजी शिक्षण विभागाकडून घेतली जात आहे. त्यासाठी शाळांची मानके व मूल्यमापनाकरिता ह्यशाळा सिद्धीह्ण हा राष्ट्रीय कार्यक्रम ह्यसमृद्ध शाळाह्ण या नावाने राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. प्रत्येक शाळेस आपल्या क्षमतेने सर्वोत्कृष्ट परिणाम मिळवण्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांचे मूल्यमापन ह्यशाळा सिद्धीह्ण या राष्ट्रीय कार्यक्रमाद्वारे करण्यात येत आहे. यामुळे शालेय स्तरावर शिक्षणाची मानके सुधारण्यास मदत होणार आहे. सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याचा शिक्षण हक्क कायद्याने प्राप्त झालेला आहे. फेब्रुवारी २0१७ अखेर राज्यातील १00 टक्के शाळांचे शाळा सिद्धी स्वयं मूल्यमापन करावयाचे होते. मात्र, या दरम्यान १00 टक्के शाळांचे शाळा सिद्धी स्वयं मूल्यमापन झाले नाही. त्यामुळे मुदत वाढवून देण्यात आली आहे. ह्यशाळा सिद्धीह्ण या उपक्रमामध्ये सन २0१६-१७ या शैक्षणिक सत्रात आतापर्यंत अमरावती विभागातील ११ हजार ८५२ शाळांपैकी ११ हजार ४७ शाळांनी सहभाग घेतला आहे, तर ३६३ शाळा ह्या शाळा सिद्धी कार्यक्रमात प्रगतीपथावर आहेत. परंतु अद्यापही अमरावती विभागातील ४४२ प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शाळा सिद्धी कार्यक्रमाची सुरुवातच झाली नाही. त्यामुळे पश्‍चिम विदर्भातील ४४२ शाळांचे स्व-मूल्यांकन कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. २९ एप्रिलपर्यंत करावे लागणार मूल्यांकन पूर्ण!शाळांच्या मूल्यांकनासाठी फेब्रुवारी २0१७ ची मुदत देण्यात आली होती. परंतु राज्यातील हजारो शाळा या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा मार्च २0१७ ची मुदत देण्यात आली. तरीसुद्धा काही शाळांनी शाळा सिद्धी उपक्रमाकडे पाठ फिरविल्याने आता २९ एप्रिलपर्यंत बाह्य मूल्यांकन पूर्ण करावे लागणार आहे. ५१४२ शाळांची शाळा सिद्धीकडे पाठ राज्यातील १ लाख ८ हजार ७0७ शाळांपैकी ९७ हजार ७५१ शाळांनी सहभाग घेतला आहे. तर ५ हजार ८१४ शाळा यातील शाळा सिद्धी कार्यक्रमात प्रगतीपथावर आहेत. परंतु अद्यापही राज्यातील ५ हजार १४२ प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शाळा सिद्धी कार्यक्रमाची सुरुवातच झाली नाही. ५ हजार १४२ शाळांनी शाळा सिद्धी उपक्रमाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.प्रत्येक शाळेत शाळा सिद्धीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी २९ एप्रिलची मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे ज्या शाळांचे स्व-मूल्यांकन झाले नाही, ते २९ एप्रिलपर्यंत पूर्ण होतील. - एन. के. देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.