ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. 10 - कव्हळा येथील जिल्हा परिषद शाळेतील जवळपास ४२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यामुळे त्यांना उपचारार्थ येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात ७ आॅक्टोबर रोजी संध्याकाळी ८.३० वाजता भरती करण्यात आले.चिखली तालुक्यातील कव्हळा येथील जिल्हा परिषद शाळेतील काही विद्यार्थ्यांच्या शिळे अन्न खाण्यात आल्यामुळे मळमळ, उलटी तसेच पोटदुखीचा त्रास होण्यास सुरूवात झाली. त्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक विजय वाघमारे, केंद्र प्रमुख आर.आर.पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवानंद जाधव यांनी जवळपास ४२ विद्यार्थ्यांना उपचारासाठी बुलडाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. यावेळी ६ विद्यार्थ्यांची तब्बेत गंभीर असल्यामुळे जिल्हा सामान्य रूग्णालयातील वैद्यकीयअधिकाऱ्यांनी त्यांना भरती करून इतर विद्यार्थ्यांवर औषधोपचार करून सोडून देण्यात आले.
बुलडाण्यात ४२ विद्यार्थ्यांना विषबाधा
By admin | Updated: October 7, 2016 22:49 IST