शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात महाराष्ट्रातील ४१ कैद्यांचा हृदयविकाराने मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 01:43 IST

एनसीआरबीच्या अहवालानुसार, संपूर्ण राज्यात १३५० कारागृहे आहेत. या कारागृहांची क्षमता ४ लाख ३ हजार ७३९ कैद्यांची असताना गेल्या वर्षभरात ४ लाख ७८ हजार ६०० कैद्यांना कोंबण्यात आले.

मुंबई : कारागृहात सर्वाधिक मृत्यू आजारपणामुळे झाले असून यात, हृदयविकाराने मृत्यू झालेल्यांचे प्रमाण अधिक असल्याचे एनसीआरबीच्या अहवालातून समोर आले. गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील ४१ कैद्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आहे.एनसीआरबीच्या अहवालानुसार, संपूर्ण राज्यात १३५० कारागृहे आहेत. या कारागृहांची क्षमता ४ लाख ३ हजार ७३९ कैद्यांची असताना गेल्या वर्षभरात ४ लाख ७८ हजार ६०० कैद्यांना कोंबण्यात आले. महाराष्ट्रातील ९ मध्यवर्ती, २८ जिल्हा कारागृहांसह एकूण ६४ कारागृहांचा यात समावेश आहे. यात पुरुष २२,८३० आणि महिला १,२६५ अशी एकूण २४ हजार ९५ कैद्यांची क्षमता असताना, ३६ हजार ७९८ कैदी या कारागृहांत आहेत. गेल्या वर्षभरात या कारागृहांत १३२ कैद्यांचा मृत्यू झाला. यात १२१ कैद्यांचा नैसर्गिक तर ११ जणांचा अनैसर्गिकरीत्या मृत्यू झाला आहे. यात, हृदयविकाराने ४१ कैद्यांचा मृत्यू झाला.३९ कैदी पसारगेल्या वर्षभरात महाराष्ट्रातून सर्वाधिक ३९ कैदी (न्यायालयीन कोठडीत असलेले) पसार झाले होते. यात कारागृहातून १३, कारागृहाबाहेरून ९ तर पोलीस कोठडीतून १७ जण पसार झाले आहेत.