शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

४० हजार कोटींचे व्यवहार झाले ठप्प; बँकांच्या संपाचा लघु उद्योगांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 06:59 IST

‘मार्च एण्ड’साठी व्यावसायिकांची प्रत्यक्ष बँकेत जाऊन करण्याची महत्त्वाची कामे संपामुळे राहून गेली.

मुंबई :   केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या संपामुळे सरकारी बँकांचे व्यवहार ठप्प होऊन सूक्ष्म आणि लघू उद्योगाच्या ३५ ते ४० हजार कोटींच्या व्यवहारांना फटका बसला आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी बाजारातील रोखीचे व्यवहार जवळपास ठप्प झाल्याचे पहायला मिळाले. शनिवार ते मंगळवार चार दिवस सरकारी बँका बंद असल्याने सर्वसामान्य ग्राहकांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. ‘मार्च एण्ड’साठी व्यावसायिकांची प्रत्यक्ष बँकेत जाऊन करण्याची महत्त्वाची कामे संपामुळे राहून गेली. आर्थिक वर्षअखेर असल्यामुळे बुधवारपासून पुढचे दोन दिवस बँकांचे अधिकारी कामात व्यस्त असतील. त्यामुळे ग्राहकांना ते वेळ देऊ शकणार नाहीत. परिणामी उद्योग क्षेत्राला हा संपूर्ण आठवडा बँक विरहित कामकाजाचा ठरणार आहे, असे महाराष्ट्र औद्योगिक आणि आर्थिक विकास संघटनेचे संस्थापक तथा ‘एसएमई चेंबर ऑफ इंडिया’चे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे यांनी लोकमतला सांगितले.ऑनलाइन सुविधा उपलब्ध असल्या, तरी आरटीजीएस, एनइएफटीच्या पलीकडे त्यांचा फारसा फायदा होत नाही. गेल्या चार दिवसांपासून धनादेश वठविण्याची प्रक्रिया बऱ्याच अंशी थांबल्यामुळे लघू आणि मध्यम उद्योग व व्यावसायिकांना मोठा फटका बसला आहे. गेल्या आठवड्यात जमा केलेले धनादेश वठले नसल्याने देणी रखडली. बँकांना याचा फरक पडत नसला तरी उद्योजकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे साळुंखे म्हणाले.मुंबईत रोज वटतात हजार कोटींचे धनादेशमुंबईच्या क्लिअरिंग हाऊसमध्ये दररोज सुमारे १ हजार कोटींची उलाढाल होते. यात १२ राष्ट्रीयीकृत बँकांसह सर्व खासगी बँकांच्या धनादेशांचा समावेश आहे. सुट्ट्या आणि आर्थिक वर्षअखेरीच्या कामांमुळे पाच दिवस व्यवहारांवर परिणाम जाणवणार आहे, अशी माहिती अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी यांनी दिली.संपात सहभागी नसलेल्या काही मोजक्या संघटनांच्या सदस्यांच्या सहाय्याने एक-दोन व्यवहार करीत बँकांचे काम सुरळीत असल्याचा अहवाल सरकारपर्यंत पाठविण्यात आला. वस्तुस्थिती पाहता संपामुळे बँकांच्या ७० ते ७५ टक्के कामकाजावर परिणाम झाला. सरकारने जर आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून अधिवेशनात बँकिंग दुरुस्ती विधेयक मांडले, तर लढा आणखी तीव्र केला जाईल.- देवदास मेनन, सरचिटणीस, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन