शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

उसाची ४०० वाहने रोखली

By admin | Updated: December 16, 2015 00:28 IST

रांगोळीत ‘स्वाभिमानी’चे आंदोलन : ठरल्याप्रमाणे पहिली उचल देण्याची मागणी

हुपरी : शासन, शेतकरी संघटना आणि साखर महासंघाच्या संयुक्त बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार साखर कारखान्यांकडून उसाच्या एफआरपीच्या ८० टक्के प्रतिटन पहिली उचल देण्यास साखर कारखानदार टाळाटाळ करीत असल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी सकाळी रांगोळी (ता. हातकणंगले) येथे संपूर्ण ऊस वाहतूक बंद पाडली. सुमारे ४०० हून अधिक उसाने भरलेली वाहने रांगोळी-जंगमवाडी मार्गावरील पटांगण, रस्ते, ओसाड माळरानामध्ये उभी करून ठेवल्याने या परिसराला साखर कारखान्याच्या गाडीअड्ड्यासारखे स्वरूप आले आहे. जिथेपर्यंत नजर पोहोचेल तेथपर्यंत उसाने भरलेली ट्रक व ट्रॅक्टर-ट्रॉलीच दिसत आहेत. साखर कारखान्यांकडून उसाची पहिली उचल एफआरपीच्या ८० टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न करता केवळ १७०० रुपयेच जमा करण्यात येत असल्याची माहिती रांगोळीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना समजताच तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी रात्री गावातील हुपरीच्या जवाहर साखर कारखान्याच्या विभागीय कार्यालयाला टाळे ठोकले. तसेच परिसरातील सर्वच मार्गांवरून सुरू असणारी साखर कारखान्यांची वाहतूक रोखून धरत बंद पाडली. रात्रीपासून अखंडपणे जागे राहून सर्व वाहने रांगोळी-जंगमवाडी मार्गावरील मोकळी पटांगणे, रस्ते, ओसाड माळरानावरती उभी करण्यास भाग पाडले. दुपारी चार वाजेपर्यंत सुमारे ४०० हून अधिक वाहने आंदोलनस्थळी उभी होती. शेतकऱ्यांची रक्कम आदा करावी, अन्यथा ऊस वाहतूक बंद पाडण्याचा इशारा देणारे निवेदन परिसरातील साखर कारखान्यांना १३ डिसेंबरला दिले होते. तरीही कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिटन १७०० रुपयेच जमा करण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे संघटनेतर्फे सोमवारी रात्रीपासूनच साखर कारखान्यांची ऊस वाहतूक बंद पाडली आहे, अशी माहिती प्रकाश पाटील यांनी दिली. ते म्हणाले, परिसरातील जवाहर-२५३८, दत्त शिरोळ-२५२६, पंचगंगा-२६०३, शरद नरंदे-२५६३, गुरुदत्त-२६२७, शाहू कागल-२५८६, मंडलिक-२६६७ अशी एफ.आर.पी.ची रक्कम या कारखान्यांनी निश्चित केली आहे. या रकमेच्या ८० टक्के म्हणजे साधारण २००० ते २१०० रुपयांची पहिली उचल या कारखान्यांनी जमा करणे गरजेचे असताना प्रतिटन केवळ १७०० रुपये जमा करण्याचा घाट घातला आहे. नियमाप्रमाणे रक्कम जमा होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महावीर पाटील, जयवंत सादळे, प्रफुल्ल मगदूम, संतोष पाटील, सुदर्शन पाटील, यवगोंडा पाटील, राजकुमार पाटील, एम. आर. पाटील, सातगोंडा हुन्नरगे, सचिन पाटील, सुरेश देसाई, दीपक पाटील, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. स्वाभिमानी आजपासून कारखाने बंद पाडणारकोल्हापूर/ पुणे : जे कारखाने मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या तोडग्याप्रमाणे ‘एफआरपी’च्या ८० टक्के रकमेनुसार शेतकऱ्यांना ऊस बिले देणार नाहीत, ते कारखाने आज, बुधवारपासून बंद पाडण्याचा निर्णय पुण्यात पत्रकार भवनमध्ये झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत झाला. अध्यक्षस्थानी खासदार राजू शेट्टी होते. नेते शरद जोशी यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर तिथेच जमलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ही बैठक घेतली.या बैठकीस सदाभाऊ खोत, कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, जालंदर पाटील, सावकार मादनाईक, सागर हिप्परगे, जनार्दन पाटील, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. कारखाने बंद पाडले तर नुकसान शेतकऱ्यांचेच होते, म्हणून यावर्षी संघटनेने ऊस वाहतूक रोखण्याचे व कारखाने बंद पाडण्याचे आंदोलन केले नाही. तरीही कारखानदार शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची ऊस बिले द्यायला तयार नाहीत. हंगाम सुरू होऊन दीड महिना झाला तरी बिले दिलेली नाहीत. त्यामुळे आता संघटनेने आक्रमक पवित्रा घ्यावा व कारखाने बंद पाडल्याने होणाऱ्या परिणामांचा विचार न करता आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे चार पैसे जास्त मिळावेत, या उद्देशानेच आम्ही आंदोलन करीत आहोत. ऊस, ऊस वाहतूक करणारी वाहने, चालक अशी संपूर्ण मालमत्ता ही शेतकऱ्यांचीच असून, वाहनाला व चालकांना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचणार नाही, याची काळजी घेत आहे. आंदोलनस्थळी असणारे ड्रायव्हर-क्लिनर यांच्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जेवणाची सोय केली आहे. - प्रकाश पाटील, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटनाशेट्टी यांची आयुक्तांशी चर्चादरम्यान, ही बैठक होण्यापूर्वी खासदार शेट्टी यांनी साखर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांचीही भेट घेतली व शासनाने या आंदोलनात बघ्याची भूमिका घेतल्यास आम्हाला रस्त्यावर उतरून संघटनेची ताकद दाखवावी लागेल, असे स्पष्ट केले. त्याची दखल घेऊनच आयुक्तांनी सर्व कारखान्यांची बैठक बोलाविल्याचे त्यांना सांगितले.