शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमी मोहर येऊनही यंदा ४० टक्के आंबा कमीच; हवामान बदलाचा फटका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 09:07 IST

हवामान बदलाने काळवंडला आंबा; चढ्या दरानेच करावी लागणार खरेदी 

मनोज गडनीस

मुंबई : झपाट्याने होणारे वातावरणीय बदल आणि विविध कीटकांचे हल्ले याचे ग्रहण आंबा उत्पादनाला लागले असून, यंदा विक्रमी मोहर येऊनही आंब्याचे उत्पादन मात्र ४० टक्क्यांनी घटणार आहे. यामुळे आंबा उत्पादक, व्यापारी तर हवालदिल झाले आहेतच, पण दुसरीकडे आंब्याची आवकच घटल्यामुळे ग्राहकांना चढ्या दरानेच आंबे खरेदी करावे लागतील.

प्रसिद्ध हापूस आंब्याचे उत्पादन २०११ पासून सातत्याने घटताना दिसत असून, यंदाच्यावर्षी याच्या उत्पादनात तब्बल ४० टक्के घट होण्याची चिन्हे आहेत. देसाई बंधू आंबेवाले कंपनीच्या आनंद देसाई यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, यंदा जानेवारीत विक्रमी मोहर आला होता. मात्र, त्यानंतर कोणत्याही औषधाला फारसा प्रतिसाद न देणाऱ्या ‘थ्रीप्स’ नावाच्या कीटकाने मोहरावर हल्ला करत त्यातील रस शोषून घेतला. यामुळे फळधारणा नीटशी झालीच नाही. सारखा पाऊस, सारखी थंडी आणि सारखे ऊन, अशा अनियमित ऋतुचक्रामुळे आंब्याला एक विशिष्ट बुरशी लागते आणि आंबा आतून कुजत जातो. दरम्यान, उत्पादकांसारखाच फटका वितरकांनाही बसत आहे. आंब्यामधे प्रचंड अस्थिरता  असून आवकही अनियमित आहे. ३० टक्के अर्थात १२ पैकी ४ आंबे खराब लागत आहेत. त्यात मोठ्या प्रमाणावर जाळी सापडत असल्याची माहिती ग्रो ब्रँडचे मुख्य कार्यकारी अधिकारी निरंजन विद्यासागर यांनी दिली. साधारणपणे मे महिन्याच्या मध्यानंतर आंब्याच्या किमती कमी होताना दिसतात. यंदा मात्र दर कमी होण्याची शक्यता कमी आहे. 

यंदाची स्थिती काय? दरवर्षी गुढीपाडव्याला वाशी मार्केटमध्ये आंब्याच्या एक लाख पेट्या येतात. यंदा मात्र अवघ्या २१ हजार पेट्याच आल्या.अक्षय्य तृतीयेला दीड लाख पेट्या वाशी मार्केटला येतात. यंदा जेमतेम ५० हजार पेट्या येण्याचा अंदाज आहे.

यंदा थंडीमुळे मोहर छान आला होता. पण वातावरणात प्रचंड बदल होत गेले. दिवसा ३० अंश सेल्सिअस तर रात्री २० अंश सेल्सिअस, इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल होतात. होळीनंतर १५ दिवस मळभ होते, अशा बदलांमुळे फळधारणा नीट होत नाही आणि उत्पादनही घटत आहे. - नीलेश पटवर्धन, श्रीकृष्ण मँगो

सरत्या दहा वर्षांत नैसर्गिक आपत्ती, वातावरणातील बदलांचा मोठा फटका आंबा उत्पादनाला बसला असून उत्पादन घटत आहे. - आनंद देसाई, देसाई बंधू आंबेवाले 

टॅग्स :Mangoआंबा