शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

४0 लाखांच्या रोकडसह दरोडेखोर जेरबंद !

By admin | Updated: August 4, 2016 00:58 IST

भरदिवसा सेनगाव येथे लुटली होती बँक; रिसोड पोलीस, शेगाव खोडकेच्या ग्रामस्थांची कामगिरी.

रिसोड (जि. वाशिम),दि. ३: : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील हैद्राबाद बँकेतील कर्मचार्‍यांना चाकूचा धाक दाखवून भरदिवसा ४0 लाख रुपयांची रोकड लुटून पसार होणार्‍या तीन दरोडेखोरांना वाशिम जिल्ह्यातील शेगाव खोडके येथील ग्रामस्थ व पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद केले. स्टेट बँक ऑफ हैद्राबाद शाखा सेनगाव येथे हिंगोली शाखेतील अधिकारी व कर्मचारी ३ ऑगस्ट रोजी सकाळी ४0 लाख रुपयांची रोकड महिला कर्मचार्‍याच्या ताब्यात देत असताना दरोडेखोरांनी चाकूचा धाक ही रक्कम लुटली. या रकमेसह ते टाटा सुमो जीपमधून पसार झाले. ही घटना हिंगोली पोलिसांना समजताच त्यांनी वाशिम मुख्यालयाशी संपर्क साधून नाकेबंदी करण्याच्या सूचना दिल्या. रिसोड पोलिसांनी नाकाबंदी केली. दोन वेगवेगळी पथके दरोडेखोरांच्या शोधात होती. दरोडेखोर सेनगाव येथून आजेगाव मार्गे शेगाव खोडकेकडे जात असल्याची गुप्त माहिती एका पथकाला मिळाली. पोलिसांनी लगेच शेगाव खोडके येथील ग्रामस्थांच्या मदतीने नाकेबंदी केली. दरोडेखोरांचे वाहन दिसताच पोलिसांनी तीन किलोमीटर अंतरापर्यंत या वाहनाचा पाठलाग केला. आपला पाठलाग होत असल्याचे लक्षात येताच दरोडेखोरांनी गावठी पिस्तूलमधून दोन वेळा पोलीस वाहनाच्या दिशेने गोळ्या झाडल्या. तथापि, पोलीस व ग्रामस्थांनी दरोडेखोरांचा पाठलाग सुरूच ठेवला व त्यांच्या मुसक्या आवळल्या. यावेळी एक दरोडेखोर पळून गेला. दरोडेखोरांना जेरबंद केल्यानंतर पोलिसांनी ४0 लाखांची रोकड व टाटा सुमो तसे अन्य साहित्य जप्त करण्यात आले. जनार्धन वाघमारे, रा. मांडेगाव, ता. जि. हिंगोली, राजेंद्रसिह महिपालसिंह बाबरी (२५ वर्षे), रा. सद्गुरू नगर बडनेरा व बाबूसिंह टाक, रा. वडाळी जि. अमरावती अशी दरोडेखोरांची नावे आहेत. चोरलेली 'सुमो' मूर्तिजापूरची !या गुन्हय़ात दरोडेखोरांनी वापरलेली एमएच ३८- २३७ क्रमांकाची टाटा सुमो जीप दरोडेखोरांनी २ जुलै रोजी मूर्तिजापूर येथून चोरली होती. जनार्धन वाघमारे या आरोपीवर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल असून तो पॅरोलवर आला होता, तसेच त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हाही दाखल आहे. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जयकुमार चक्रे, ठाणेदार प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरिभाऊ कुळवंत, विठ्ठल खुळे, रवींद्र हुंडेकर, गजानन शिंदे, नारायण चंदनशिव, लक्ष्मण पोटे, प्रवीण ढवणे, विनोद घनवट, रोहित ठाकरे, विजेंद्र इंगोले, गजानन पांचाळ, उत्तमराव गायकवाड, नरसिंग हाके, काकडे आदी पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी ही विशेष कामगिरी बजावली.