शहरं
Join us  
Trending Stories
1
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
2
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
3
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
4
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
5
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
6
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
7
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
8
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
9
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
10
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
11
Operation Sindoor Live Updates: 'आता फक्त पीओके परत करण्यावरच चर्चा होणार'; भारताने प्रस्ताव फेटाळला
12
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
13
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
14
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
15
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
16
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
17
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
18
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
19
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
20
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार

४० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेला चिमुकला बचावला

By admin | Updated: February 2, 2015 01:08 IST

बोअरवेलमध्ये पडलेल्या अडीच वर्षीय चिमुकल्याला वाचविण्यात आपत्ती प्रक्रिया दल आणि प्रशासनाला तब्बल १२ तासांच्या परिश्रमाने यश आले. सहा इंच व्यास असलेल्या बोअरवेलमध्ये

१२ तास बचाव अभियान : आपत्ती प्रक्रिया दल आणि प्रशासनाला यशफुलसावंगी (यवतमाळ) : बोअरवेलमध्ये पडलेल्या अडीच वर्षीय चिमुकल्याला वाचविण्यात आपत्ती प्रक्रिया दल आणि प्रशासनाला तब्बल १२ तासांच्या परिश्रमाने यश आले. सहा इंच व्यास असलेल्या बोअरवेलमध्ये ४० फूट खोल अडकलेल्या चिमुकल्याने बाहेर काढल्यानंतर आई म्हणून दिलेली हाक अनेकांच्या हृदयाला छेदून गेली. उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथील शेतातील बोअरवेलमध्ये शनिवारी दुपारी ३ वाजता सुरज शंकर आखरे हा चिमुकला पडला होता. त्याला वाचविण्यासाठी प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले. जेसीबीच्या मदतीने बोअरवेलला समांतर खड्डा खोदण्यात आला. आपत्ती प्रक्रिया दलाच्या जवानांनी महत्प्रयासाने खड्डा आणि बोअरवेलदरम्यान भुयार खोदले. या भुयारातून रात्री २.३० वाजताच्या सुमारास सुरजला सुखरूप बाहेर काढण्यात आले. तत्काळ त्याला फुलसावंगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बचाव कार्यासाठी आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार उत्तमराव इंगळे, उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला, तहसीलदार डॉ. सचिन शेजाळ तळ ठोकून होते. प्रशासनाने जेसीबीच्या मदतीने खड्डा खोदल्यानंतर आपत्ती प्रक्रिया दलाचे हरिचंद्र राठोड, पृथ्वीराज चव्हाण, अभिषेक राजहंस, तनय कोथळे, धीरज राऊत, प्रतीक काळसर्पे, रोशन राठोड आणि अकोला येथील अजिंक्य ग्रुपच्या चार जवानांनी सबलीच्या साहाय्याने भुयार खोदून सुरजला बाहेर काढले. त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. आईच्या चेहऱ्यावर चिमुकला सुखरूप बाहेर आल्याचा आनंद अश्रुवाटे मोकळा होत होता. सुरजपुढे नियती हरली असाच काहीसा प्रत्यय आला. सुरज बोअरवेलमध्ये पडला तेव्हापासून त्याला सुखरूप बाहेर काढेपर्यंत पंचक्रोशीतील हजारो नागरिक तळ ठोकून बसले होते. (प्रतिनिधी)