शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मध्य रेल्वेवर ३९७ कोटींची कामे

By admin | Updated: October 23, 2014 04:21 IST

रोड ओव्हर ब्रिज, लांब पल्ल्याच्या प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण, तांत्रिक कामे, नवीन पादचारी पूल अशी एकूण ३९७ कोटी १४ लाख रुपयांची कामे केली

मुंबई : मध्य रेल्वेकडून येत्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात कामे हाती घेतली जाणार आहेत. रोड ओव्हर ब्रिज, लांब पल्ल्याच्या प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण, तांत्रिक कामे, नवीन पादचारी पूल अशी एकूण ३९७ कोटी १४ लाख रुपयांची कामे केली जाणार असून त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी नुकताच रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर मोठ्या प्रमाणात कामे हाती घेऊन प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनी एक बैठक घेऊन कामांचा आढावा घेतला आणि यात अनेक कामांसाठी सकारात्मक विचार करत ते मंजुरीसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला. सीएसटी स्थानकात २४ डब्यांच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांसाठी प्लॅटफॉर्मचे विस्तारीकरण करण्यात येणार असून त्यासाठी १ कोटी ६२ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. त्याचप्रमाणे मुंबई विभागात असणारे लाइन क्रॉस गेट बंद करून त्याऐवजी रोड ओव्हर ब्रिजही बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या कामासाठी ५२ कोटी ८७ लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. महत्त्वाची बाब म्हणजे काही स्थानकांवर असणाऱ्या पादचारी पुलांची दुरवस्था झाली असून त्याऐवजी नवीन पादचारी पूल बांधण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. आसनगाव, दिवा, मुंब्रा, भांडुप, मस्जिद, शिवडी आणि दादर स्थानकात बांधण्यात येणाऱ्या नवीन पादचारी पुलांचा एकूण खर्च हा १५ कोटी रुपये असेल. मध्य रेल्वेकडून सिग्नल आणि दूरसंचार, पुलांचे नूतनीकरण आणि रेल्वेच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्ते सुरक्षा कामांसाठीही १३0 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. अशा एकूण ३९७ कोटी १४ लाख रुपयांच्या कामांचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून तयार करण्यात आला असून तो रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)