मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांची गर्दी आता वाढू लागणार आहे. रेल्वे किंवा एसटीचे आरक्षण न मिळाल्यास चाकरमानी मिळेल त्या खासगी वाहनाने गावी जातात. अशावेळी वाहन चालकांकडून वाहतुकीचे नियम पाळण्यात येत नसल्याने अपघाताला सामोरे जावे लागते. धोकादायक रस्ते व वळणांवर (ब्लॅक स्पॉट) अपघातांचे प्रमाण मोठे असते. त्यामुळे गणेशात्सव काळात त्यावर वाहतूक पोलिसांकडून लक्ष केंद्रीत केले जात आहे. महामार्गांवर अशाप्रकारे ३९ धोकादायक रस्ते व वळणे आहेत. त्यामुळे ‘जरा जपून, पुढे धोका आहे,’ असे आवाहन करण्यात येणार आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारा चाकरमानी मिळेल त्या वाहनाने आपल्या गावी जातो. कोणत्याही परिस्थितीत गावी पोहोचायचेच या इराद्याने आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करतो. उत्साहाच्या भरात खासगी वाहने चालवणारे आणि वेळेत पोहोचण्यासाठी सुरक्षेची काळजी न घेता खसगी बस हाकणारे अपघातांना कारणीभूत ठरतात. त्यात मुंबई- गोवा मार्गावर तब्बल ३९ धोकादायक रस्ते आणि वळणे असल्याचे महामार्ग पोलीस सांगितले. या धोकादायक रस्त्यांवरून वाहन चालवताना गेल्या चार वर्षात गणेशोत्सवकाळात २० पेक्षा जास्त जणांना आपले प्राण गमवावे लागले असल्याचे महामार्ग पोलिसांतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. पळस्पे येथे दहा, वाकण येथे पाच, महाड येथे पाच, कशेडी येथे सहा, चिपळूण येथे पाच, हातखंबा येथे पाच आणि कणकवली येथे तीन धोकादायक वळणे व रस्ते धोकादायक आहेत.गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना महामार्गावर काही ठिकाणी खड्ड्याांचा सामना करावा लागणार आहे. यात खोपोली ते वडखळ नाका दरम्यान , वडखळ नाका रेल्वे ब्रीज पुढे नवगावाजवळ, डोळवी गावाजवळ उजव्या बाजूस, इस्पान कंपनी गोवा गेट समोर, गडब गावच्या मंदिरासमोरील रस्ता, आनंदनगर, जुई गाव, आयटेम गाव, गांधे फाटा, कासु गाव, कर्णाली स्टॉपजवळ, सुकेळी खिंड, पुई गाव, लकी ढाब्याजवळ, कोलाट रेल्वे पुलाखाली, कोलाट नाल्याजवळ, रातवड गावासमोर, धरणाची वाडी गावाजवळ, वावे दीपाळी पुलावर, पुलाच्या पुढे,पोलादपूर बाजू भोगांवे (खोत), दत्तवाडी, मेळंगेवाडी, रत्नागिरी बाजूस बोरघर गांव ते जाधव पेट्रोलपंप भरणेगांव, भोस्ते घाट,मोरवडे ते पिरलोटे, परशुराम घाटातील साईडपट्टी व फरशी तिठा नजीक, चिपळूण ते सावर्डे, सावर्डे ते आरवली, हातखंबा ते पाली, वेरळ, देवधे, लांजा, वाटुळ, ओणी व राजापूर, खारेपाटन चेकपोस्ट, नऊगांवे, हुमरठ, कणकवली, आकेरी या ठिकाणांचा समावेश आहे.
मुंबई-गोवा मार्गावर ३९ वळणे धोक्याची
By admin | Updated: September 14, 2015 02:29 IST