शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

३८.८३ लाख नोक-या!, राज्य सरकारचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 6:12 AM

राज्य सरकारने आयोजित केलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या गुंतवणूक परिषदेला अपेक्षेहून अधिक प्रतिसाद मिळाला. १० लाख कोटी रुपये गुंतवणुकीची अपेक्षा असताना

मुंबई : राज्य सरकारने आयोजित केलेल्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या गुंतवणूक परिषदेला अपेक्षेहून अधिक प्रतिसाद मिळाला. १० लाख कोटी रुपये गुंतवणुकीची अपेक्षा असताना, तब्बल १६ लाख ८८३ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले. यातून ३८ लाख ८३ हजार ४६१ लोकांसाठी रोजगार निर्माण होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.गुंतवणूक परिषदेत एकूण ४,१०६ करार झाले. त्याद्वारे ३६ लाख ७७ हजार १८५ रोजगारनिर्मितीचे आश्वासन देण्यात आले आहे. याखेरीज सरकारकडून १०४ प्रकल्पांत गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली असून, त्याद्वारे २ लाख ०६ हजार २७६ इतक्या रोजगारांची निर्मिती होणार आहे. या परिषदेच्या समारोपात फडणवीस यांनी सांगितले की, यंदा गुंतवणूक केवळ सामंजस्य करारांपर्यंत मर्यादित ठेवण्यात आली नाही, तर गुंतवणुकीची इच्छा असलेल्या प्रकल्पांनाही इरादा पत्र देण्यात आले. मराठवाड्यात अधिक गुंतवणूक करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.मागास भागांना संजीवनीलातूर । ६०० कोटींचा रेल्वे डब्यांचा कारखानानांदेड। इंडिया अ‍ॅग्रोचे २०० कोटीहिंगोली। शिऊड अ‍ॅग्रोटेकचे १२५ कोटीनंदुरबार। जीनस पेपरचा ७०० कोटींचा करारगडचिरोली। ७०० कोटींचा लॉईड एनर्जीचा करारहायपरलूपचा अभ्यास पूर्णहायपरलूपसारखे जगात कुठेही नसलेले नवीन तंत्रज्ञान भारतातच आणले जात आहे. त्याच्या यशाची हमी काय? असा प्रश्न उपस्थित झाला. मात्र, कंपनीने व्यवहार्यता अभ्यास पूर्ण केला आहे. आता विस्तृत प्रकल्प आराखडा तयार केला जात आहे. त्यानंतर, १० किमीचा चाचणी घेतली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.‘सहभाग’ पोर्टलविकास मिशनमध्ये सर्वांना सहभागी होता यावे, यासाठी ‘सहभाग’ पोर्टल सुरू करण्यात आले असून, मुख्यमंत्र्यांच्या विशेषाधिकारी प्रिया खान व निधी कामदार यांनी या पोर्टलची रचना केली आहे.

टॅग्स :Magnetic Maharashtraमॅग्नेटिक महाराष्ट्र