शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

३८२ जवानांची ‘तोपची तुकडी’ सज्ज : नाशिक तोफखाना केंद्राच्या जवानांनी घेतली निष्ठेने देशसेवेची शपथ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 16:12 IST

‘मैं सच्चे मन सें भारतीय संविधान के प्रती वफादार रहुंगा और इमानदारी से देश की सेवा करुंगा...’ ‘देश की सेवा में हवा, पाणी और पृथ्वी के किसी भी रास्ते से जाना पडे तो मैं खुशी से जाऊंगा...चाहे मुझे इसमे अपना बलिदान देना पडे...’

ठळक मुद्दे४४ आठवड्यांचे अवघड सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करत ३८२ जवानांनी बटालियन देशसेवेसाठी सज्ज भारतातील सर्वात मोठे तोफखाना केंद्र म्हणून ओळखसंचलन समीक्षक म्हणून पंजाब-हरयाणा-हिमाचलप्रदेशचे सब कमान्डर मेजर संजीव चौधरी उपस्थित आपण भारताचे सैनिक असून आपला धर्म देशसेवा अन् सैनिक हीच आपली जात असल्याचे लक्षात घ्यावे‘शेर-ए-जवान’ ही वैशिष्ट्यपूर्ण धून वाजवत लष्करी बॅण्डच्या पथकासोबत मैदानावर नवसैनिकांचे आगमन

नाशिक : ‘मैं सच्चे मन सें भारतीय संविधान के प्रती वफादार रहुंगा और इमानदारी से देश की सेवा करुंगा...’ ‘देश की सेवा में हवा, पाणी और पृथ्वी के किसी भी रास्ते से जाना पडे तो मैं खुशी से जाऊंगा...चाहे मुझे इसमे अपना बलिदान देना पडे...’ अशी ‘कसम’ तोफखाना केंद्राच्या ३८२ जवानांनी दिमाखात सशस्त्र संचलन करीत वरुणराजाच्या साक्षीने घेतली.निमित्त होते, देशाच्या सर्वात मोठ्या अशा तोफखाना प्रशिक्षण केंद्र नाशिकरोडच्या शपथविधी सोहळ्याचे ! यावेळी ४४ आठवड्यांचे अवघड सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करत ३८२ जवानांनी बटालियन देशसेवेसाठी सज्ज झाली.भारतीय सैन्याच्या पाठीचा कणा मानल्या जाणाºया भारतातील सर्वात मोठे तोफखाना केंद्र म्हणून ओळख असलेल्या नाशिकरोड तोफखाना केंद्रातील सैन्यदलात भरती झालेल्या ३८२ प्रशिक्षणार्थी जवानांनी सैन्याच्या प्राथमिक व प्रगत व आधुनिक तंत्रज्ञान व शस्त्रांचे प्रशिक्षण पूर्ण केले. ही तुकडी देशसेवेसाठी सज्ज असून, विविध ‘युनिट’मध्ये सैन्यदलाच्या तोफखान्यात हे नवसैनिक भविष्यात योगदान देणार आहे. या जवानांचा सामूहिक शपथविधी सोहळा शनिवारी (दि.२६) मैदानावर तोफखाना केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

यावेळी संचलन समीक्षक म्हणून पंजाब-हरयाणा-हिमाचलप्रदेशचे सब कमान्डर मेजर संजीव चौधरी उपस्थित होते. ‘शेर-ए-जवान’ ही वैशिष्ट्यपूर्ण धून वाजवत लष्करी बॅण्डच्या पथकासोबत मैदानावर नवसैनिकांच्या तुकडीचे लष्करी थाटात आगमन झाले. दरम्यान, चौधरी हे सलामी मंचावर येताच जवानांच्या तुकडीने त्यांना ‘सॅल्यूट’ केले. कवायत मैदानाला खुल्या जिप्सी जीपमधून फेरी मारत संचलनाच्या तयारीचे निरीक्षण केले. लष्करी बॅण्डच्या तालावर जवानांच्या तुकडीने यावेळी सशस्त्र संचलन लष्करी थाटात सादर केले.

यावेळी चौधरी म्हणाले, आपण जरी वेगवेगळ्या प्रांताचे रहिवासी असलो आणि विविध भाषा बोलत असलो तरी आता तुम्ही हे सर्व विसरुन केवळ आपण भारताचे सैनिक असून आपला धर्म देशसेवा अन् सैनिक हीच आपली जात असल्याचे लक्षात घ्यावे. तिरंगा आणि तोफांच्या समोर घेतलेली शपथ आपल्या पुर्ण कारकिर्दित लक्षात ठेवून वर्तणूक करावी. कुठल्याही प्रकारचा राजकिय विचार मनात न आणता शारिरिक-मानसिकदृष्ट्या सक्षम राहून देशसेवेत भरीव योगदान द्यावे. तसेच एकात्मता व सांघिक कामगिरीचा सातत्याने प्रयत्न करावा, असा गुरूमंत्र यावेळी त्यांनी दिला. याप्रसंगी तोफखाना केंद्राचे कमान्डंट ब्रिगेडियर जी.एस.बिंद्रा यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी व नवसैनिकांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.