शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गावचे रस्ते होणार चकचकीत; ३७ हजार किमीचे नवे रस्ते, ७ हजार किमीचे मार्ग होणार सिमेंटचे

By यदू जोशी | Updated: February 11, 2024 07:47 IST

३० हजार किमीचे रस्ते सार्वजिनक बांधकाम विभागाच्या धर्तीवर हायब्रीड ॲन्युटी मॉडेलनुसार ग्रामविकास विभागाकडून बांधले जातील. 

मुंबई : राज्यात ३७ हजार किमीचे ग्रामीण रस्ते बांधण्याची मोठी योजना महायुती सरकार राबविणार आहे. त्यातील ३० हजार किमीचे रस्ते हे हायब्रीड ॲन्युटीनुसार व सात हजार किमीचे सिमेंट रस्ते बांधले जाणार आहेत. ग्रामविकास विभागाने या  बाबतची योजना आखली आहे.  राज्यात ग्रामीण व इतर जिल्हा मार्ग मिळून २ लाख ९७ हजार किमी लांबीचे रस्ते हे ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीत येतात. पंतप्रधान ग्रामीण रस्ते विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यात त्यातील ३२ हजार किमीचे रस्ते बांधण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात ३० हजार किमीचे रस्ते बांधणे सुरू झाले. सध्याच्या महायुती सरकारने आणखी १० हजार किमीच्या रस्त्यांची कामे आता सुरू केली आहेत. आणखी सात हजार किमीचे रस्ते बांधण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी लवकरच येणार आहे. 

सिमेंट काँक्रीट रस्त्यांचे जाळेसात हजार किमीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे (व्हाइट टॉपिंग) असतील. त्यामुळे ते अनेक वर्षे खराब होणार नाहीत. इतक्या मोठ्या लांबीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे बांधण्याची राज्यातील ही पहिलीच वेळ असेल. काँक्रीटच्या रस्त्यासाठी साधारणत: किलोमीटरमागे १.५२ कोटी रुपये खर्च येतो. म्हणजे सात हजार किमीसाठी अंदाजे १०,७०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. डांबर रोड बांधण्यासाठीचा खर्च किमीमागे एक कोटी रुपये इतका येतो. 

‘हायब्रीड ॲन्युटी’ काय?३० हजार किमीचे रस्ते सार्वजिनक बांधकाम विभागाच्या धर्तीवर हायब्रीड ॲन्युटी मॉडेलनुसार ग्रामविकास विभागाकडून बांधले जातील. या मॉडेलमध्ये ५० टक्के निधी सरकार देते. उर्वरित ५० टक्के निधी हा कंत्राटदार टाकतो आणि रस्ते बांधल्यानंतरच्या दहा वर्षांत कंत्राटदाराला सरकार व्याजासह त्याची रक्कम परत करते. या दहा वर्षांत रस्त्यांची देखभाल कंत्राटदार करतो.  राज्यात सार्वजिनक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत प्रमुख जिल्हा मार्ग आणि राज्य महामार्ग येतात. त्यांची लांबी ९७ हजार किमी इतकी आहे. 

२.९७ हजार किमीचे ग्रामीण रस्ते राज्यात आहेत. अनेक ठिकाणी रस्ते खराब असल्याच्या तक्रारी येतात. त्यावर हे रस्ते नव्याने आणि मजबूत बांधणे हाच पर्याय असून त्या दृष्टीने वेगाने काम केले जाईल. - गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री

राज्यात पंतप्रधान ग्रामीण रस्ते योजनेची स्थिती

पहिल्या टप्प्यात काम झाले ३२,००० किमी

दुसऱ्या टप्प्यात काम झाले ३०,००० किमी

तिसऱ्या टप्प्यात काम सुरू १०,००० किमी

लवकरच मंजुरी मिळणार ७,००० किमी

एकूण ७९,००० किमी 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक