शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

३७ हजार कोटींचे मुंबई महापालिका बजेट सादर

By admin | Updated: February 3, 2016 18:14 IST

मुंबई महापालिकेचा २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा ३७ हजार ०५२ कोटींचा अर्थसंकल्प बुधवारी दुपारी स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३ - मुंबई महापालिकेचा २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा ३७ हजार ५२ कोटींचा अर्थसंकल्प बुधवारी दुपारी स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात नरिमन पॉईंट ते कांदिवलीपर्यंतच्या कोस्टल रोडसाठी ( सागरी महामार्ग) १ हजार कोटींची तरतूद करण्यात आली असून रस्त्यांसाठी एकूण २८०६.८० कोटींची तरतूद केली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेला प्राधान्य देत महापालिकेने त्यासाठी १० कोटींची तरतूद केली आहे. 
दरम्यान आरोग्य व वैद्यकीय विभागासाठी ३ हजार ६९३ कोटी रुपये तर शिक्षण विभागासाठी एकूण २ हजार ३९४ कोटींची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे, मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शैक्षणिक क्षेत्रासाठी १०७ कोटी कमी देण्यात आले आहेत.  नवीन मिनी सायन्स सेंटरसाठी ३.५ कोटी, शाळांमधील स्वच्छतागृहांसाठी १० कोटींची तरतूद आहे.
 
मुंबईत पेट्रोल- डिझेल होणार महाग
येत्या काळात मुंबईतील पेट्रोल व डिझेलच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आज मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पात कच्च्या तेलावरील जकात कर ३ टक्क्यांवरून वाढवून साडेचार टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव आजच्या अर्थसंकल्पात मांडण्यात आला. त्यामुळे नजीकच्या काळात मुंबईत पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता आहे. 
 
अर्थसंकल्पातील महत्वाच्या तरतुदी :
 
- कोस्टल रोडसाठी १ हजार कोटींची तरतूद
- शहरातील रस्त्यांसाठी २८०६.८० कोटी 
- एलईडी दिव्यांसाठी १० कोटी रुपये
- स्मार्ट सिटीसाठी १० कोटी 
- राजावाडी व डॉ. आंबेडकर रुग्णालयात बालकांसाठी मिल्क बँकची योजना.
- सायन व नायर रुग्णालयात सुरू होणार बर्थ डिफेक्ट कंट्रोल क्लिनिक.
- देवनार पशुगृहासाठी १३७.९५ कोटी रुपयांची तरतूद
- गलिच्छ वस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी ६१० कोटींची तरतूद
- कचऱ्याबद्दलच्या जनजागृतीसाठी १५ कोटी 
- पर्जन्य जलवाहन्यांसाठी १४०८.४८ कोटी 
- ३७ शाळांच्या दुरुस्तीसाठी २२७.२४ कोटी, कॉम्प्युटर लॅब निर्मितीसाठी १७ कोटी ६८ लाख रुपयांची तरतूद 
- व्हर्च्युअल क्लासरुमसाठी १५ कोटी ८८ लाख 
- पालिका शाळांमधील प्रसाधनगृहे हायजेनिक करणार.