शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

३५ हजार पोलिसांचा बंदोबस्त

By admin | Updated: September 21, 2015 14:38 IST

मुंबईसह राज्यात सर्वत्र साजऱ्या होत असलेल्या गणेशोत्सवाच्या काळात मुंबई पोलीस दलातील ३५ हजार जवानांसह राज्य दहशतवादविरोधी दल, फोर्स वन, शीघ्र कृती दल,

मुंबईसह राज्यात सर्वत्र साजऱ्या होत असलेल्या गणेशोत्सवाच्या काळात मुंबई पोलीस दलातील ३५ हजार जवानांसह राज्य दहशतवादविरोधी दल, फोर्स वन, शीघ्र कृती दल, एसआरपीएफ, बॉम्बशोधक व नाशक पथक शहरातील विविध ठिकाणी तैनात ठेवण्यात आले आहे. सोमवारी पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. यामध्ये पोलिसांचे विशेष लक्ष वाहतूककोंडी होऊ नये, याकडे असणार आहे. मुंबईत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात ६,२६९ सार्वजनिक गणपती मंडळांसह ८,९५१ गौरी-गणपती, १ लाख १४ हजार ९३१ घरगुती गणपती आहेत. अशात सोमवारी गौरी-गणपतीसह पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहेत. मुंबई पोलिसांच्या आकडेवारीनुसार ७६४ सार्वजनिक गणपती आणि ३१ हजार २२९ घरगुती गणपतींचे सोमवारी विसर्जन होणार आहे. यामध्ये मोठ्या गणपती मंडळांची संख्या कमी असल्याने पोलिसांचे विशेष लक्ष वाहतूक नियंत्रणावर असणार आहे. गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, पवई गणेशघाट अशा महत्त्वाच्या विसर्जन ठिकाणांसह शहरातील ११८ विसर्जनाच्या ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विसर्जनाच्या ठिकाणी पोलिसांसह ५५१ जलसुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. चौपाट्यांवर जास्त गर्दी करू नये, लहान मुलांना आणणे शक्यतो टाळावे, वाहनांचा वापर कमी करावा, असे आवाहन पोलिसांकडून भाविकांना करण्यात येत आहे.