शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

महाडमधील ३४ गावे दरडीच्या छायेत

By admin | Updated: May 21, 2016 03:08 IST

दरडींचा धोका होवू नये यासाठी ३४ गावांमधील सुमारे नऊ हजार ग्रामस्थांना अन्यत्र स्थलांतर करण्याच्या सूचना महसूल विभागामार्फत देण्यात आल्या

महाड : तालुक्यात जुलै २००५ मध्ये अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीत झालेल्या जीवितहानी आणि वित्तहानीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तसेच दरडींचा धोका होवू नये यासाठी ३४ गावांमधील सुमारे नऊ हजार ग्रामस्थांना अन्यत्र स्थलांतर करण्याच्या सूचना महसूल विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.२००५ च्या नैसर्गिक आपत्तीमध्ये महाड तालुक्यातील दासगांव, जुई, रोहन-वलंग, कोंडीवते या गावावर दरडी कोसळून शेकडो जणांचे बळी गेले होते, तर असंख्य कुटुंबाचे संसार बेघर झाले होते. त्यावेळी प्राईड इंडिया, लालबागचा राजा ट्रस्ट, जनकल्याण ट्रस्ट आदि सेवाभावी संस्थांच्या आर्थिक सहकार्यातून रोहन, जुई, कोंडीवते, दासगाव आदिवासीवाडी येथील दरडग्रस्त कुटुंबांना मोफत घरे देण्यात आली होती. मात्र गेल्या दहा वर्षांपासून तालुक्यातील अनेक गावांना दरडींचा धोका सतावत आहे. भूगर्भ शास्त्रज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार महाडमधील ३४ गावांना या दरडींचा धोका असल्याचा अहवाल दिला आहे. त्यानुसार दासगाव, नडगाव तर्फे बिरवाडी, रायगडवाडी, मांडले, कोथर्डे, वाकी बुद्रुक, कडसरी, लिंगाणा, सव, चोचिवे,मुठवली, लोअर तुडील, जुई बुद्रुक, कोसबी, कुंबळे, वराठी, खैरे तर्फे तुडील आंबेशिवघर, कुर्लेदंडवाडी, कोथेरी, जंगमवाडी, शिंगरकोड मोरेवाडी, मुमुर्शी, बौध्दवाडी, मुमुर्शी गावठाण, पिंपळकोंड, आंबेनवी, मोहात, सह्याद्रीवाडी (आंबेशिवथर) लोअर तुडील, नामोळी कोंड, पारमाची, माझेरी, आंबीवली पानेरीवाडी, या गावातील २ हजार ५७३ घरांना दरडीचा धोका असून या पार्श्वभूमीवर दोन हजार ५० कुटुंबातील ९ हजार ग्रामस्थांना पावसाळ्यात तीन महिने अन्य ठिकाणी स्थलांतर करावे अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली आपत्कालीन आढावा बैठक डॉ. आंबेडकर सभागृहात घेतली. त्यावेळी महसूल विभागाचे तलाठी, मंडल अधिकारी यांनी सतर्क रहावे अशा सूचना दिल्या आहेत. या बैठकीला तहसीलदार संदीप कदम, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, पोलीस निरीक्षक नितीन जगताप, नायब तहसीलदार सचिन गोसावी आदि विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महसूल विभागामार्फत दरडग्रस्त गावांतील कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्याला स्थानिक ग्रामस्थ किती प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागलेले आहे. यापैकी अनेक धोकादायक ठिकाणची कुटुंबे आपले घर गाव सोडून अन्यत्र स्थलांतर करण्याच्या मन:स्थितीत नाहीत.>अधिकाऱ्यांना सूचनायंदाच्या हंगामात नेहमीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे दिल्यामुळे महसूल यंत्रणेमार्फत विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. दरडग्रस्त गावातील ग्रामस्थांनी दरडींचा धोका टाळण्यासाठी स्वत:हून स्थलांतरित व्हावे. जर ही कुटुंबे स्थलांतरित झाली नाहीत तर त्या कुटुंबाचे जबरदस्तीने स्थलांतर करण्यात येणार असल्याचा इशारा प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांनी दिला आहे.