शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात गुन्हे करुन ३३३ विदेशी भूमिगत ; २0८ नायजेरियन

By admin | Updated: August 25, 2016 19:41 IST

देश विदेशी पाहुण्यांसाठी नंदनवन ठरलेल्या गोव्यात गेल्या पाच वर्षांच्या काळात ५८३ विदेशी नागरिकांनी वेगवेगळे गुन्हे केले त्यातील ३३३ जण अद्याप भूमिगत आहेत.

ऑनलाइन लोकमतपणजी, दि. 25 : देश विदेशी पाहुण्यांसाठी नंदनवन ठरलेल्या गोव्यात गेल्या पाच वर्षांच्या काळात ५८३ विदेशी नागरिकांनी वेगवेगळे गुन्हे केले त्यातील ३३३ जण अद्याप भूमिगत आहेत. त्यांचा ठावठिकाणा लागलेला नसून यात २0८ जण नायजेरियन नागरिक आहेत, अशी धक्कादायक माहिती पोलिस उपमहानिरीक्षक विमल गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. गुन्हेगार विदेशी नागरिकांना स्थानबध्द केल्यास त्यांना ठेवण्यासाठी स्थानबध्दता केंद्र राज्यात नाही याची उणीव व्यक्त करताना अलीकडे आग्वाद किल्ल्याचा काही भाग अशा केंद्रासाठी देण्याची तयारी सरकारने दर्शविल्याचे त्यानी सांगितले.

साळगांव येथे अलीकडेच ओबे सन्नी (३६), आगुस्तिन आनेफो (३१) व जोशुआ इझे (३२) या तीन नायजेरियन नागरिकांना पकडण्यात आले होते. त्यांच्याकडील व्हिसा तसेच पासपोर्ट बोगस असल्याचे मुंबईतील इमिग्रेशन केंद्र तसेच नायजेरियाचे भारतातील उच्चायुक्त कार्यालय आणि भारताचे नायजेरियातील उच्चायुक्त कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर आढळून आले. हे तिघे सांगोल्डा येथे सरपंच नीळकंठ नाईक यांच्या घरात भाड्याने रहात होते. भाडेकरु ठेवताना मालकाने त्यांच्याकडून ह्यसीह्ण फॉर्म भरुन घ्यायचा असतो. या तिघांच्या ह्यसीह्ण फॉर्मवरुनच चौकशी केली असता त्यांचा गुन्हा आढळून आला. पोलिसांनी या प्रकरणी भादंसंच्या कलम ४६५, ४६८,४७१,४२0 कलमांखाली तसेच १९४८ च्या विदेशी नागरिक कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हे नोंदविले आहेत. घरमालकांनी भाडेकरु ठेवताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच ह्यसीह्ण फार्म भरुन घ्यावेत. संशयास्पद हालचाली आढळून आल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहन गुप्ता यांनी केले आहे. साळगांवच्या प्रकरणात तिघांचेही येणे- जाणे वेळी, अवेळी असायचे. अनेकदा आठ-आठ दिवस ते गायब असायचे. या तिघांचा गुन्हेगारी प्रकरणांशी काही संबंध आहे का, याची शहानिशा केली जात आहे.

स्थानबध्दता केंद्रासाठी आग्वाद किल्ल्यात जागा गुप्ता म्हणाले की, बेकायदा वास्तव्य करणाऱ्या विदेशींना पोलिस महत्प्रयासाने पकडतात परंतु त्यांची मायदेशी परत पाठवणी करेपर्यंत त्यांना ठेवण्यासाठी राज्यात स्थानबध्दता केंद्र नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन अनेक राज्यांनी अशी केंद्रे उघडलेली आहेत मात्र गोव्यात अजून असे केंद्र होऊ शकलेले नाही. खासकरुन आफ्रिकन खंडातून येणारे नागरिक आपली नावे, पत्ते खोटेच देतात. ते कुठल्या राष्ट्राचे आहेत याची अनेकदा खातरजमा होत नाही.