शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील ३२ पोलीस अंमलदारांना उपनिरीक्षकपदी बढती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 20:26 IST

ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमधील ३२ अंमलदारांना उपनिरीक्षक पदी बढती देण्यात आली आहे.

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे, दि. 18 : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमधील ३२ अंमलदारांना उपनिरीक्षक पदी बढती देण्यात आली आहे. त्यांनी आता प्रशिक्षण पूर्ण केल्यामुळे त्यांच्यापैकी १४ अधिकाऱ्यांची अन्यत्र बदली करण्यात आली असून उर्वरित १८ अधिकाऱ्यांना आहे त्याचठिकाणी पदोन्नतीवर कायम ठेवण्यात आले आहे. बदलीमध्ये गुन्हे अन्वेषण विभागाच्या नऊ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.या अंमलदारांना २६ मे २०१७ रोजी पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाकडील आदेशाने उपनिरीक्षक पदावर बढती देण्यात आली. त्यानुसार त्यांना ६ जून २०१७ रोजी उपनिरीक्षक पदी तात्पुरत्या स्वरुपात पदोन्नतीचे आदेश देण्यात आले. त्यांना १५ दिवसांचे प्रशिक्षण दिल्यानंतर सुरुवातीला आहे त्याच ठिकाणी नियुक्ती दिली होती. आता या अधिकाऱ्यांना ठाणे शहर आयुक्तालयाच्या निकडीनुसार अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी पदोन्नतीवर बदलीचे आदेश दिले.या अधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे कंसात बदलीचे ठिकाण दिले आहे. यात गुन्हे अन्वेषण विभागाचे सुनिल चव्हाणके (ठाणेनगर), लक्ष्मण जोरी (नौपाडा), प्रल्हाद भामरे (भिवंडी शहर), मारुती दिघे (निजामपुरा), अशोक माने (भोईवाडा), प्रदीप गायकवाड (मानपाडा), बाबासाहेब मुल्ला (डोंबिवली), बबन आवटे (भिवंडी शहर) आणि दिलीप वीर यांची शहर वाहतूक शाखेत बदली झाली आहे. तर महेंद्र घाग यांना वाहतूक शाखेतून कोळशेवाडी पोलीस ठाण्यात बदली मिळाली असून अतिक्रमण विभागाचे रमेश कदम यांना डोंबिवली तर निळकंठ करुणकर यांना टिळकनगर पोलीस ठाणे मिळाले आहे. कल्याणच्या नियंत्रण कक्षातील काशीनाथ चौधरी यांना विष्णूनगर तर भिवंडी नियंत्रण कक्षातील शिवाजी कदम यांना भोईवाडा पोलीस ठाण्यात काम करण्याची संधी देण्यात आली आहे.पुढील १८ अधिकाऱ्यांना आहे त्याचठिकाणी बढतीवर कायम ठेवले आहे. यामध्ये सदाशिव नाठे (विशेष शाखा), नंदकुमार फडतरे (खडकपाडा), प्रमोद दळवी (मुंब्रा), मारुती कोहिनकर (बदलापूर पूर्व), रोहिदास पाटील (टिळकनगर), अप्पाजी सस्ते (ठाणेनगर), रहिम मुलाणी, आत्माराम पाटील (शहर वाहतूक शाखा), किशोर पाटील (शांतीनगर), अरुण उतेकर (मुख्यालय), गोरक्षनाथ वाघ (मध्यवर्ती), रविंद्र पाटील (मानपाडा), विलास नलावडे (कोळसेवाडी), अनिल पाटील (भिवंडी शहर), दिनेश चव्हाण (श्रीनगर) आणि मेहमूद मुलाणी (वागळे इस्टेट) आदींचा समावेश आहे. या सर्व अधिकाऱ्यांना तत्काळ बदलीच्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.