शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ३२ खेळाडू पुरस्कार करणार परत; शासकीय सेवेत संधी देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 07:25 IST

गेल्या वर्षी शिवजयंतीस मागणी केल्यानंतर शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, अद्याप एकालाही नोकरी मिळालेली नाही.

सांगली : राज्य सरकारकडून खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार दिला जातो; पण या खेळाडूंना शासकीय नोकरी देण्याचे राज्य शासनाचे आश्वासन फोल ठरले आहे. त्यामुळे राज्यातील ३२ खेळाडूंनी शिवजयंतीपर्यंत निर्णय न झाल्यास शिवछत्रपती पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेतला आहे. नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली.क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकाविण्यासाठी खेळाडूंचे प्रयत्न सुरू असतात. सर्व कसोट्यांतून गेल्यानंतर खेळाडूंना शिवछत्रपती पुरस्कार मिळतो. हा सन्मान मिळविल्यानंतर आणि मैदान सोडल्यावर नोकरीअभावी या खेळाडूंची आर्थिक कोंडी होते. अनेक शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त खेळाडू आज रंगकामासह शेतमजुरीची कामे करीत आहेत. यामुळे क्रीडा क्षेत्र व क्रीडा चळवळीत बाधा येत आहे. राज्य शासनाने शिवछत्रपती पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंना त्यांच्या पात्रतेनुसार शासकीय सेवेत नोकरी देण्याची खेळाडूंची मागणी आहे. याबाबत गेल्या वर्षी शिवजयंतीस मागणी केल्यानंतर शासकीय नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन शासनाने दिले होते. मात्र, अद्याप एकालाही नोकरी मिळालेली नाही. आता यंदाच्या शिवजयंती म्हणजे १९ फेब्रुवारीपर्यंत राज्य सरकारने याबाबत ठोस निर्णय घेतला नाही, तर २० फेब्रुवारीला राज्यातील ३२ खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार परत करणार आहेत. हे सर्व खेळाडू सोशल मीडियाच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. याबाबतचे निवेदन त्यांनी राज्य सरकारला दिले.