शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

सहकार न्यायालय वकील संघाच्या अध्यक्षांविरुद्ध ३0७ विधिज्ञांची तक्रार

By admin | Updated: August 10, 2014 19:04 IST

सहकार न्यायालयाबाबत नवा वाद उपस्थित झाला आहे.

अकोला: सहकार न्यायालयाच्या उद्घाटनाचा सोहळा आटोपून आठवडा उलटला नाही, तोच सहकार न्यायालयाबाबत नवा वाद उपस्थित झाला आहे. अँड. सुभाषसिंह ठाकूर यांनी स्वत:ला सहकार न्यायालय वकील संघाचे अध्यक्ष म्हणून पुढे केले. कार्यकारिणीचेही फलक लावून नवा वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्याविरूद्ध ३0७ विधिज्ञांनी बार असोसिएशनकडे तक्रार नोंदविली असून, त्यावर तोडगा काढण्यासाठी बार असोसिएशनने १२ ऑगस्ट रोजी आमसभा बोलाविली आहे. २ ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती के.के. तातेड, सहकार अपिलीय न्यायालयाचे अध्यक्ष साळवे यांच्या उपस्थितीत सहकार न्यायालयाचे उद्घाटन झाले. त्यापूर्वी अकोला बार असोसिएशनचे अध्यक्षांनी १५ जुलै रोजी ठराव घेऊन सहकार न्यायालयाचे अध्यक्ष व कार्यकारिणीविषयी निवडणूक घेण्याचे बार असोसिएशनच्या फलकावर सुचित केले होते; परंतु सहकार न्यायालयाचे उद्घाटन होताच अँड. सुभाषसिंह ठाकूर यांनी स्वत:ला सहकार वकील संघाचे अध्यक्ष घोषित करीत त्यांची २८ विधिज्ञांची कार्यकारिणीही तयार केली. सहकार न्यायालयाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असतानाच, सहकार वकील संघाच्या कार्यकारिणीविरुद्ध बार असोसिएशनसह ३0७ विधिज्ञ आक्षेप नोंदविणार होते. परंतु विधिज्ञांनी शांततेची भूमिका घेतली.यासोबतच काही विधिज्ञ कामगार न्यायालय, कर न्यायालय, ग्राहक मंच, कौटुंबिक न्यायालय, धर्मदाय आयुक्त न्यायालय आदींचे स्वयंघोषित अध्यक्ष व कार्यकारिणी स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली करीत असल्याचा आरोप अँड. नंदकिशोर शेळके, अँड. प्रवीण तायडे यांनी केला. अँड. ठाकूर यांनी सहकार न्यायालय वकील संघाची कार्यकारिणी स्थापनेची परवानगी न घेतल्याने त्यांची कार्यकारिणी रद्द करण्यात यावी व नियमानुसार सहकार न्यायालयाच्या सदस्यांची नोंदणी करून अध्यक्ष व कार्यकारिणीची निवड करावी अशी मागणी केली आहे.