शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भेसळयुक्त पदार्थांचा ३० हजार किलोचा साठा जप्त , सप्टेंबर महिन्यातील कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 04:41 IST

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळखोर अधिकाधिक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे याविषयी खबरदारी घेत, अन्न व औषध प्रशासन विभागाने या भेसळखोरांवर बारीक लक्ष ठेवण्याचे काम सुरू केले आहे

मुंबई : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भेसळखोर अधिकाधिक वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे याविषयी खबरदारी घेत, अन्न व औषध प्रशासन विभागाने या भेसळखोरांवर बारीक लक्ष ठेवण्याचे काम सुरू केले आहे. सप्टेंबर महिन्यात मुंबईसह राज्यभरातून अन्न व औषध प्रशासन विभागाने खवा, मावा, मिठाई, वनस्पती तेल-तूप अशा विविध भेसळ असलेल्या पदार्थांचा तब्बल ३० हजार ४४९ किलोचा साठा जप्त केला आहे. त्यामुळे ग्राहकांनी सतर्क राहून भेसळखोरांपासून सावध राहण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाने केले आहे.‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणत, दिवाळीच्या फराळांची मनसोक्त लज्जत चाखली जाते. या कालावधीत फराळासाठी मावायुक्त पदार्थांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अशा पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात होत असल्याने, याचा फायदा घेत विक्रेते भेसळ करतात. त्यातून विषबाधेसारखे प्रकार घडतात. राज्य व राज्याबाहेरून आणण्यात येणाºया मावायुक्त पदार्थांवर नजर ठेवण्यासाठी दरवर्षी एफडीएकडून विशेष मोहीम राबविली जाते. दिवाळीनिमित्त शहरात मिठाई आणि फराळाच्या पदार्थांसाठी तूप, तेल, दुग्धपदार्थांची मागणी वाढते. त्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा करण्यात अडथळे निर्माण होतात. अशा वेळी भेसळयुक्त माल बाजारात विक्रीसाठी आणण्याचा प्रयत्न केला जातो. गेल्या काही दिवसांपासून मिठाई तयार करण्यासाठी खवा, तसेच वनस्पती तुपाची मागणी वाढली आहे.दिवाळीपूर्वी काही दिवस अगोदर व दिवाळीच्या कालावधीत ही मोहीम राबविली जाते. सप्टेंबर महिन्यात राबविण्यात आलेल्या मोहिमेत एकूण ८२२ भेसळयुक्त पदार्थांचे नमुने तपासणीसाठी जप्त केले आहेत.एफडीएच्या विशेष भरारी पथकाकडून ही कारवाई केली जाते. महत्त्वाची रेल्वे स्थानके व जेथे मालाची ने-आण केली जाते, अशा ठिकाणी विशेष नजर असते, असे एफडीएचे सहआयुक्त (अन्न) मुख्यालय चंद्रशेखर साळुंखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :diwaliदिवाळी