शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावच्या युवकाजवळून ३ पिस्तुले जप्त

By admin | Updated: May 11, 2017 03:04 IST

मालेगाव येथील युवकाजवळून जिवंत काडतुसांसह ३ पिस्तुले ठाणे ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी भिवंडीनजीकच्या वडपे येथून जप्त केली.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मालेगाव येथील युवकाजवळून जिवंत काडतुसांसह ३ पिस्तुले ठाणे ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी भिवंडीनजीकच्या वडपे येथून जप्त केली. वसीम अली शेख (३२) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने आरोपीला १२ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.भिवंडी-निजामपूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने ठाणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे आणि त्यांचे सहकारी मंगळवारी भिवंडी परिसरात गस्त घालत असताना, वडपे गावातील सिद्धू धाब्यावर एक जण पिस्तुले विकण्यासाठी येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने लगेच धाब्याजवळ पोहोचून पाळत ठेवली. काही वेळानंतर एक युवक संशयास्पद स्थितीत वावरताना आढळला. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ तीन पिस्तुले आणि तीन जिवंत काडतुसे आढळली. भिवंडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने ती मध्य प्रदेशातून आणली असल्याची माहिती प्राथमिक तपासातून मिळाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.