शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

३ लाख ८९ हजार ५२० विद्यार्थी देणार ‘सीईटी’

By admin | Updated: May 10, 2017 02:36 IST

अभियांत्रिकीसह, औषधनिर्माणशास्त्र अशा सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या राज्य सामायिक

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभियांत्रिकीसह, औषधनिर्माणशास्त्र अशा सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या राज्य सामायिक प्रवेश परीक्षेसाठी (एमएचटी सीईटी) यंदा ३ लाख ८९ हजार ५२० विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे. राज्यातील १ हजार ११० उपकेंद्रांवर ११ मे रोजी पार पडणाऱ्या या परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात झेरॉक्स, फोन आणि इंटरनेट सुविधा बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.परीक्षेत एकून तीन प्रश्नपत्रिकांचा समावेश असेल. त्यात प्रत्येकी ५० गुणांसाठी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र या विषयांची सामायिक प्रश्नपत्रिका असेल, तर गणित आणि जीवशास्त्र विषयांसाठी प्रत्येकी १०० गुणांच्या स्वतंत्र प्रश्नपत्रिका असतील. परीक्षेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) या विषयांसह १ लाख ४४ हजार ८१३ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातील. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) विषयांसाठी ९५ हजार ५४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, याउलट ‘पीसीएमबी’साठी १ लाख ४९ हजार १६२ विद्यार्थी सीईटी देणार आहेत. यामध्ये मुंबईतील ८० हजार ३३६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी ठरवून दिलेल्या वेळेनंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. तरी सर्व नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर वेळेत उपस्थित राहण्याचे आदेश सीईटी सेलचे आयुक्त चंद्रशेखर ओक यांनी दिले आहेत.२५ तृतीयपंथी विद्यार्थी परीक्षा देणार-या वर्षी तृतीयपंथी विद्यार्थ्यांनीही या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. केंद्र शासन आणि सर्वोच्च न्यायालयाने परीक्षा अर्जात विद्यार्थ्यांचे लिंग लिहिताना स्त्री, पुरु ष यांच्याबरोबर इतर असा पर्याय देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हा पर्याय गेल्या वर्षीपासून उपलब्ध करून दिला आहे. गेल्या वर्षी मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नव्हता.