शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

राज्यातील २९ टक्के विद्यार्थी ‘सरल’ बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 12:01 IST

Education Sector News २९ टक्के विद्यार्थ्यांची नोंद अद्यापही शिक्षण विभागाच्या सरल प्रणालीमध्ये झालेली नाही.

- सदानंद सिरसाट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या एकुण विद्यार्थ्यांपैकी २९ टक्के विद्यार्थ्यांची नोंद अद्यापही शिक्षण विभागाच्या सरल प्रणालीमध्ये झालेली नाही. त्यांची नोंदणी येत्या मार्च अखेर पूर्ण करण्यासाठी आधार नोंदणी किंवा त्यामध्ये दुरूस्तीसाठी मार्च २०२१ पर्यंतची डेडलाइन शिक्षण विभागाने दिली आहे. प्रत्येक पंचायत समिती स्तरावर आधार नोंदणीचे दोन केंद्र आॅक्टोबरपासूनच सुरू करण्याचेही विभागाने २९ सप्टेंबर रोजी बजावले आहे.शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत राज्यात १ लाख १० हजार ३१५ शाळा सुरू आहेत. त्यामध्ये २ कोटी २५ लाख ६० हजार ५७८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार, राजीव गांधी अपघात सानुग्रह अनुदान योजना, मोफत गणवेश योजना, पाठ्यपुस्तक योजनांचा लाभ दिला जातो.हा लाभ देण्यासाठी शासनाने शिक्षण विभागाची ‘सरल’ प्रणाली विकसित केली आहे. त्या प्रणालीमध्ये एकुण विद्यार्थ्यांपैकी ६४ लाख ५९ हजार ३८८ विद्यार्थ्यांची नोंदणी अद्यापही झालेली नाही. त्यामध्ये काहींची दुबार नोंद झाल्याचेही पुढे आले आहे. तसेच काही अस्तित्त्वात नसलेल्या विद्यार्थ्यांचीही नोंदणी झाल्याचे प्रकार घडले आहेत. हा गोंधळ थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदवून त्याची पडताळणी केली जात आहे.

टॅग्स :khamgaonखामगावEducation Sectorशिक्षण क्षेत्र