मुंबई- राज्यातील २८ हजार ग्रामपंचायती डिजिटल करण्याच्या सरकारच्या कार्यक्रमात सहयोग देण्याची तयारी हॅल्वेट-पॅकर्ड कंपनीने दर्शविली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सॅन फ्रॅन्सिस्को येथे कंपनीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षणाच्या सोयी पोहोचतील. तसेच, ग्रामीण जीवनात आमूलाग्र बदल होणार असल्याचे त्यांनी कंपनीचे सीईओ मेग व्हाइटमन यांना सांगितले. या प्रकल्पात सहभागी होण्याची तयारी व्हाइटमन यांनी दर्शविली. यूएस इंडिया बिझनेस कौन्सिलचे ऊर्जा धोरणविषयक संचालक नॉल्टी थेरिआॅट यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. राज्यातील उद्योगसुलभतेच्या उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच अहाना रिन्युएबल्सचे व्यवस्थापकीय संचालक जेसन तायी यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट घेतली.
२८ हजार गावे डिजिटल...
By admin | Updated: September 21, 2016 11:27 IST