शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

सीईटीमध्ये २८ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल, आता प्रवेश प्रक्रियेसाठी चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2023 10:18 IST

५ लाख ९१ हजार १३० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षेचा (एमएचटी-सीईटी) निकाल राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) सोमवारी जाहीर केला असून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित (पीसीएम) गटात १४ विद्यार्थ्यांनी आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) गटात १४ विद्यार्थ्यांनी शंभर पर्सेंटाइल मिळवले आहेत.

एमएचटी सीईटीसाठी राज्यात १९७, तसेच राज्याबाहेरील १६ केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने ९ ते २० मे या कालावधीत २४ सत्रांत परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला ३ लाख  ५४ हजार ५७३ मुलांनी, तर २ लाख ८१ हजार ५१५ मुलींनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५ लाख ९१ हजार १३० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.

आता प्रवेश प्रक्रियेसाठी चुरस

यंदाच्या निकालात १०० पर्सेंटाइलचेच २५ हून अधिक विद्यार्थी असल्याने ९५ आणि त्याहून अधिकच्या गुणांची विद्यार्थ्यांची संख्या निश्चितच अधिक असेल. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांमध्ये विविध शाखांमध्ये प्रवेशासाठी चुरस पाहावयास मिळणार आहे.

पैकीच्या पैकी घेणारे गुणवंत

  • मुंबई     १३ 
  • पुणे    ७
  • सातारा    २
  • अमरावती    १
  • कोल्हापूर    २
  • नागपूर    १
  • नाशिक    १
  • औरंगाबाद     १
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रexamपरीक्षा