शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
3
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
4
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
5
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
6
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
7
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
8
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही
10
‘सुंदर’ फिरकीने भारताचा ‘रूट’ मोकळा; भारताला विजयासाठी १९३ धावांचे लक्ष्य
11
भारताचा पराभव, पण मालिका ३-२ ने जिंकली; शेफाली वर्माची अर्धशतकी खेळी व्यर्थ
12
बाजाराची चाल कंपन्यांचे निकाल ठरवणार; विक्रीचा मारा सुरूच
13
तुमच्यामुळे झाला महाराष्ट्र टॉपर! नागरिकांची यूपीआयला पसंती
14
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
15
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
16
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
17
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
18
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
19
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
20
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे

महाराष्ट्रात एकूण २.७० कोटी वाहने

By admin | Updated: March 18, 2016 02:20 IST

राज्यात १९७१मध्ये केवळ ३ लाख ११ हजार ७६९ वाहने होती. आज ही संख्या तब्बल २ कोटी ७० लाख ६४ हजार ४५३वर पोहोचली आहे. गेल्या ४५ वर्षांमध्ये वाहन उद्योगाची झालेली ही भरभराट

मुंबई : राज्यात १९७१मध्ये केवळ ३ लाख ११ हजार ७६९ वाहने होती. आज ही संख्या तब्बल २ कोटी ७० लाख ६४ हजार ४५३वर पोहोचली आहे. गेल्या ४५ वर्षांमध्ये वाहन उद्योगाची झालेली ही भरभराट आज जारी करण्यात आलेल्या सन २०१५-१६च्या आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आली आहे. १ कोटी ९७ लाख ५ हजार ५११ मोटारसायकली, ३८ लाख ३६ हजार २९४ मोटरगाड्या, जीप आणि स्टेशन वॅगन्स, २ लाख १७ हजार ६२ टॅक्सी कॅब्ज्, ७ लाख २४ हजार ८० स्वयंचलित रिक्षा, २२ हजार ४०२ स्कूल बसेस, ४९ हजार ४८७ ट्रॅक्टर्स राज्यात आहेत. २०१५च्या आकडेवारीचा विचार करता २०१६च्या आर्थिक वर्षात तब्बल २१ लाख वाहने वाढली. राज्यात ४५ वर्षांपूर्वी दर लाख लोकसंख्येमागे मोटर वाहनांची संख्या केवळ ६१८ होती. आज ती २३ हजार ९ इतकी आहे. दर लाख लोकसंख्येमागे रुग्णवाहिकांची संख्या मात्र केवळ १२ आहे. राज्यात २ लाख ९९ हजार ३६८ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. कोकण -३३,२१९ किमी, पश्चिम महाराष्ट्र ६८८२२, उत्तर महाराष्ट्र ६६१६६, मराठवाडा - ६५४९७ अमरावती २८२८६ तर नागपूर विभागात ३७३७८ किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. ही आकडेवारी डिसेंबर २०१५ अखेरची आहे. राज्यात १९६५-६६मध्ये केवळ ५१ हजार ७८८ किलोमीटर लांबीचे रस्ते होते. आता हा आकडा २ लाख ९९ हजार ३६८ किमीवर गेला आहे. त्यात राष्ट्रीय महामार्ग ४७६६, प्रमुख राज्य महामार्ग ६१६३, राज्य महामार्ग ३३८६०, प्रमुख जिल्हा रस्ते ५०५८५, इतर जिल्हा रस्ते ५८११५, ग्रामीण रस्ते १४५८७९ किलोमीटरचे आहेत. २०१४च्या तुलनेत २०१५मध्ये विमानाची प्रवासी आणि मालवाहतूक वाढली.११ कोटी मोबाइल!राज्यात तब्बल ११ कोटी ५९ हजार मोबाइल जोडण्या आहेत. गेल्या एक वर्षात ही संख्या ६६ लाखाने वाढली. २०१४मध्ये ही संख्या १० कोटी ३४ लाख इतकी होती. टेलिफोनची संख्या मात्र घटली. २०१३-१४मध्ये ५३ लाख ७४ हजार टेलिफोन जोडण्या होत्या. आज हा आकडा ५१.११ लाख इतका आहे.