शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२७ शिक्षकांच्या निलंबनाचे निर्देश, निवडणूक आयोगाची दखल, पडताळणी टाळणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 02:50 IST

मतदार याद्यांची नव्याने पडताळणी करण्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणा-या जिल्ह्यातील २७ प्राथमिक शिक्षकांना निलंबित करण्याचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत.

यवतमाळ : मतदार याद्यांची नव्याने पडताळणी करण्याच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकणा-या जिल्ह्यातील २७ प्राथमिक शिक्षकांना निलंबित करण्याचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत. शनिवारी व्हीसीद्वारे निवडणूक निर्णय अधिकाºयांशी संवाद साधताना त्यांनी आदेश दिले.भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण देशात मतदार यादी पुनर्रीक्षण कार्यक्रम सुरू आहे. त्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांची केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना आयोगाने प्रशिक्षण दिले आहे. स्मार्ट फोनचा वापर करून मतदारांच्या घराचे अक्षांश, रेखांशही संग्रहित केले जाणार आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी शनिवारी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त अश्विनीकुमार यांनी व्हीसीद्वारे राज्यातील निवडणूक निर्णय अधिकाºयांशी संवाद साधला.व्हीसीमध्ये राळेगावचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी त्यांच्या मतदारसंघातील २७ शिक्षकांनी अशैक्षणिक कामे करणार नाही, अशी भूमिका घेऊन कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे अश्विनीकुमार यांच्या निदर्शनास आणून दिले. यामुळे मतदार नोंदणी रखडल्याने या २७ जणांविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५०मधील कलम २९ व लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१मधील कलम १३४ आणि भारतीय दंड संहितेचे कलम १९८८नुसार संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याचेही स्पष्ट केले.व्हीसीमध्ये मुख्य निवडणूक आयुक्तांनी आता या शिक्षकांविरुद्ध भारतीय लोकप्रतिनिधी कायदा १९५०मधील कलम ३२नुसार आणखी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले.देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी शनिवारी व्हीसीद्वारे आढावा घेतला. त्यांनी संबंधितांविरूद्ध कठोर कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार लवकरच पुढील कारवाई केली जाईल.- संदीपकुमार अपार, उपविभागीय अधिकारी, राळेगाव

टॅग्स :Teacherशिक्षक