शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील २७ टक्के पाण्याचा हिशेब नाही

By admin | Updated: March 15, 2016 01:42 IST

मुंबईत १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असली तरी पाणीगळती, अनधिकृत जोडण्या व पाणीचोरीच्या प्रकारांमुळे २७ टक्के पाणी नक्की कुठे जाते, याचा हिशेबच महापालिकेकडे

मुंबई : मुंबईत १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असली तरी पाणीगळती, अनधिकृत जोडण्या व पाणीचोरीच्या प्रकारांमुळे २७ टक्के पाणी नक्की कुठे जाते, याचा हिशेबच महापालिकेकडे नसल्याची कबुली नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधान परिषदेत दिली. मुंबईत पाणीगळतीमुळे ७०० दशलक्ष लीटर तर १६० दशलक्ष लीटर पाण्याची टँकर लॉबीकडून चोरी होते. अनेक ठिकाणी जलवाहिन्या फोडून पाणीचोरी होत असल्याबद्दलची लक्षवेधी सूचना भाई गिरकर, राहुल नार्वेकर, आनंद ठाकूर, हेमंत टकले आदी सदस्यांनी मांडली. यावर उत्तर देताना रणजित पाटील म्हणाले की, ‘महापालिकेच्या विशेषत: मुंबई शहरातील जलवाहिन्या शंभर वर्षे जुन्या आहेत. त्यामुळे जलवाहिन्या बदलण्याचे काम सुरू आहे. गेल्या पाच वर्षांत १५० किमी लांबीच्या जुन्या जलवाहिन्या बदलण्यात आल्या असून, जलवाहिन्यांच्या दुरुस्ती व देखभालीचा सर्वांगीण आराखडा तयार करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. यावर उपाययोजना करण्यासाठी जलवितरण सुधारणा कार्यक्रमांतर्गत सेवा सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे, तसेच गळती शोधण्यासाठी अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यात येत आहे. वर्षभरात ३९ हजार ९५६ गळत्या शोधून दुरुस्त करण्यात आल्या आहेत. शिवाय मुंबई उपनगरात नळजोडण्यांवर ३ लाख ७० हजार मीटर बसवलेले आहेत, तर १ लाख जोडण्यांवर मीटर नसल्याचे पाटील यांनी सांगितले.