शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha: मनोज जरांगेंच्या मागण्यांवर मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत काय झाला निर्णय?
2
Maratha Reservation : 'मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येईल हे शरद पवारांनी जाहीर करावं'; राधाकृष्ण विखे- पाटलांनी स्पष्टच सांगितलं
3
Maratha Reservation : मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंची गाडी अडवली, घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला
4
"जीव धोक्यात घालू नका"! मरीन ड्राईव्हवर शेकडो मराठा आंदोलक समुद्रकिनारी खडकांवर उतरले
5
२० तासांचा रहस्यमय प्रवास! चीनला पोहचण्यासाठी किम जोंग यांची सीक्रेट तयारी; शत्रूंना देणार चकवा
6
Maratha Morcha Mumbai: 'मी आयुक्तांना बोलते'; सुप्रिया सुळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट
7
भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?
8
बाबर आझमची 'मॅचविनिंग' खेळी; शोएब अख्तर, वकार युनिससारख्या दिग्गजांची केली धुलाई
9
ओबीसीतून आरक्षण घेणारच, उद्यापासून पाणीही घेणार नाही; मनोज जरांगे पाटील यांची घोषणा
10
तमिळ सुपरस्टार विशालच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का? १२ वर्षांनी लहान आहे होणारी पत्नी
11
'नरेंद्र मोदींनी चीनला क्लीन चिट दिली', पंतप्रधानांच्या चीन दौऱ्यावरुन काँग्रेस आक्रमक
12
जिओ की वीआय? रोजच्या २.५GB डेटासाठी कोणता प्लॅन स्वस्त? जाणून घ्या दोन्ही कंपन्यांचे फायदे आणि किंमत
13
बदलापुरात पोलीस कॉन्स्टेबल श्रावणी वारिंगेंनी तिसर्‍या मजल्यावरून मारली उडी; कारण काय?
14
Gauri Pujan 2025: गौराईला नैवेद्य अर्पण करण्याआधी ताटाखाली काढा पाण्याचे मंडल आणि म्हणा 'हा' मंत्र
15
"मराठा जातीने मागास नाहीत, न्यायालयात अडकवायचं आहे का?"; पाटलांनी सांगितला ओबीसी आरक्षण देण्यातील अडथळा
16
Mumbai: पर्यावरणपूरक मूर्तीच्या नैसर्गिक जलस्रोतात विसर्जनास परवानगी
17
१५ वर्षीय मुलीच्या मागेच लागला साप; १ महिन्यात ६ वेळा चावला, प्रत्येकवेळी पायावर खुणा सोडल्या
18
दिग्गज क्रिकेटपटूच्या लेकीची मैदानात एन्ट्री; चाहत्यांना सौंदर्याने घायाळ करणारी 'ती' कोण?
19
जातीच्या नावाने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न; मराठा आंदोलनावरून नितेश राणेंचा दावा
20
"आम्ही भेटायला जाणार होतो पण...", प्रियाच्या निधनाबद्दल समजताच उषा नाडकर्णींना अश्रू अनावर

१०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांना २६% दर कपात; ७० टक्के लोकांना फायदा: फडणवीसांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 10:14 IST

Light Bill: राज्यात १०० युनिटखाली विजेचा वापर करणारे ७० टक्के ग्राहक असून, त्यांना २६ टक्के दरकपात मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : महाराष्ट्रात औद्योगिक वीजदर अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वांत कमी होणार आहेत. आधीच्या टॅरिफ पिटिशनमध्ये रहिवासी ग्राहकांवर भार टाकून इंडस्ट्रियल आणि कमर्शियल दर कमी केले गेले. त्यावर आक्षेप घेतल्याने सगळ्याच कॅटेगरीचे दर कमी झाले आहेत. राज्यात १०० युनिटखाली विजेचा वापर करणारे ७० टक्के ग्राहक असून, त्यांना २६ टक्के दरकपात मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.

आ. अभिजीत वंजारी यांनी प्रश्नोत्तराच्या तासात वीज दर कमी करण्याबाबत कोणती उपाययोजना केली आहे, असा सवाल केला, तर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, औद्योगिक वीज दरासोबतच शेतकऱ्यांना होणाऱ्या विजेच्या दराची बाब निदर्शनास आणत कालबाह्य वीज मीटर बंद पडल्यानंतरही शेतकऱ्यांना लाखोंची बिले येत आहेत, याकडे लक्ष वेधले.

 ‘मेरिट ऑर्डर डिस्पॅच’ पद्धतीने विद्युत खरेदी केली जाणार असल्यामुळे खासगी कंपन्यांकडून स्वस्त दरात वीज खरेदी केली जाते. सोलर, विंड आणि बॅटरी स्टोअरेजच्या वापरामुळे विजेच्या खरेदीची किंमत मोठ्या प्रमाणात घटली आहे. हे करार २५ वर्षांचे असल्यामुळे विजेचे दर स्थिर राहतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

नवीन टॅरिफनुसार सध्या महाराष्ट्राचा दर ८.३२ रुपये असून, तो पुढील टप्प्यात ७.३८ रुपयांवर येणार आहे. टॅरिफ ट्रू-अप प्रक्रियेमुळे वीज दर वाढणार नाहीत.

कृषी क्षेत्रातही आता स्मार्ट मीटर बसविणारशेतकऱ्यांना गरजेनुसार १० एचपी हॉर्स पॉवरचे सोलर पंप देण्याची तयारी आहे. कृषी क्षेत्रात स्मार्ट मीटर व वीज वापरावर नियंत्रण असावे, यासाठी स्मार्ट मीटर लावले जाणार आहेत. यामुळे शेतीसाठी नेमकी किती वीज वापरली जाते, हे समजणे शक्य होणार असून, भविष्यकालीन धोरण आखण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :mahavitaranमहावितरणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस