शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अडीच हजार गावे करणार दुष्काळमुक्त, भारतीय जैन संघटनेचे भद्रावती येथे राज्य अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 03:28 IST

भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून विविध लोकाभिमुख उपक्रम राबवून राज्यातील ७५ तालुक्यांमधील २ हजार ५०० गावे दुष्काळमुक्त करण्यात येईल

भद्रावती (चंद्रपूर) : भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून विविध लोकाभिमुख उपक्रम राबवून राज्यातील ७५ तालुक्यांमधील २ हजार ५०० गावे दुष्काळमुक्त करण्यात येईल, असा संकल्प भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा यांनी जाहीर केला.भारतीय जैन संघटनेच्या वतीने भद्रावती येथील ऐतिहासिक जैन मंदिरात शनिवारी महाराष्ट्र राज्य अधिवेशन झाले. अध्यक्षस्थानी माजी खासदार नरेश पुगलिया, आमदार बाळू धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पारख, राष्टÑीय उपाध्यक्ष सुदर्शन जैन, प्रकाशचंद सुराणा, हस्तीमन बंब आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.मागील ३२ वर्षांपासून भारतीय जैन संघटनेतर्फे राबविण्यात आलेल्या लोकाभिमुख उपक्रमांची माहिती देऊन उद्घाटनाप्रसंगी मुथा म्हणाले, राष्टÑीय आपत्ती, मुलींचे कमी होणारे प्रमाण, कौटुंबिक समस्या, सामूहिक विवाह, वधू-वर संमेलन, अनाथ मुले, आत्महत्याग्रस्त शेतकºयांचे कुटुंब, शैक्षणिक कार्य तसेच श्रमदानासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्यातून विधायक कार्याची तेजस्वी परंपरा निर्माण झाली.‘समय है बदलाव का, समय के साथ बदल’ या विषयावर अधिवेशनात प्रामुख्याने चर्चा झाली. पुगलिया म्हणाले, मानवता हाच खरा धर्म असून तो आचरणात आणून आदर्श निर्माण केला पाहिजे. भारतीय जैन संघटनेकडून सुरू असलेल्या कार्याचा अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकरी आत्महत्यांकडेही त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले. संचालन संजय सिंगी, तर प्रास्ताविक अमर गांधी यांनी केले. अधिवेशनात भारतीय जैन संघटनेचे माजी अध्यक्ष पारस ओस्वाल, गौतम संचेती, रजनीश जैन, निर्मल बरडीया, महेंद्र सुराणा, प्रतापचंद कोठारी, प्रशांत खजांची, सुधीर बाठीया तसेच राज्यातील पदाधिकारी व प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.१० लाख विद्यार्थ्यांना ‘मूल्यवर्धित’ शिक्षणाचे धडेमहाराष्टÑ दुष्काळमुक्त करण्यासाठी एप्रिल आणि मे २०१८ मध्ये ७५ तालुक्यांतील २ हजार ५०० गावांत एकाच वेळी जेसीबी व पोकलेनद्वारे जलसंधारणाची कामे पूर्ण केली जाणार आहेत. त्यासाठी भारतीय जैन संघटनेतर्फे १०० जेसीबी व पोकलेन मशीन खरेदी करण्यात येतील. याच वर्षी ७५ तालुक्यांमध्ये वॉटर कप स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे.१०७ तालुक्यांतील शिक्षक आणि १० लाख विद्यार्थ्यांना मूल्यवर्धित शिक्षणाचे धडे भारतीय जैन संघटनेच्या वतीने दिले जात आहे, अशी माहिती शांतीलाल मुथा यांनी दिली.