गडचिरोली : महाविद्यालयीन विद्यार्थिनींना सुसंस्कारित व स्वसंरक्षणसिद्ध करण्यासाठी भारतीय जैन संघटना व गोंडवाना विद्यापीठाच्या माध्यमातून विशेष प्रकल्प राबविला जाणार आहे. विद्यापीठांतर्गत येणाऱ्या २३६ महाविद्यालयांतील २५ हजार विद्यार्थिनींना या प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प असल्याचा संघटनेचा दावा आहे.करिअरसोबतच सामाजिक आव्हाने पेलण्यासाठी विद्यार्थिनींचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘मास्टर ट्रेनिंग प्रोग्रॉम फॉर प्रिपेअरिंग’ हा विशेष कार्यक्रम सुरू केल्याची माहिती कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित व जैन संघटनेचे अध्यक्ष प्रफुलचंद्र पारेख यांनी दिली. यासाठी विशेष प्रशिक्षक तयार करण्यासाठी विविध महाविद्यालयांत १८ ते २१ फेब्रुवारीदरम्यान वर्ग घेण्यात आले. ५० विद्यार्थिनींच्या ५०० बॅचसाठी १०० प्रशिक्षक तयार केले जाणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)
२५ हजार विद्यार्थिनींचा विकास करणार
By admin | Updated: February 26, 2015 05:58 IST