शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

२५ संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार

By admin | Updated: March 20, 2017 04:03 IST

मॅट्रिकोत्तर शिष्यवृती/शैक्षणिक शुल्काच्या वाटपात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असल्याचे आता समोर

यदु जोशी / मुंबईमॅट्रिकोत्तर शिष्यवृती/शैक्षणिक शुल्काच्या वाटपात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असल्याचे आता समोर येत असून, सोलापूरनंतर आणखी पाच जिल्ह्यांमधील २५ शैक्षणिक संस्थाचालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत. या संस्थांकडून ४ कोटी ८३ लाख  ६३,६२२ रुपयांची रक्कम वसूल केली  जाणार आहे.  सोलापूर जिल्ह्यातील आठ संस्थांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आणि त्यांच्याकडून जवळपास ४ कोटी रुपयांची अनियमिततेतील रक्कम वसूल करण्याचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दोन दिवसांपूर्वीच दिले होते. आता त्याव्यतिरिक्त तब्बल २५ संस्थांवर कारवाई करण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाने समाजकल्याण आयुक्त, पुणे यांना दिले आहेत. नियमात बसत नसताना शिष्यवृत्ती देणे, जादा विद्यार्थी दाखविणे, बोगस विद्यार्थ्यांच्या नावे शिष्यवृत्ती लाटणे आणि अन्य अनियमितता या संस्थांच्या लेखापरीक्षणात समोर आल्या होत्या. राज्यभरातील शिष्यवृत्ती घोटाळ्याची चौकशी विशेष चौकशी पथकामार्फत सध्या सुरू आहे. त्यांनाही हा अहवाल देण्यात आला होता. २००८-०९ ते २०१३-१४ मध्ये हे घोटाळे घडले. सोलापूरमधील घोटाळे;सहायक आयुक्त निलंबितसोलापूर जिल्ह्यात २०१२-१३ पासून झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या शिष्यवृत्ती घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन सहायक आयुक्त दीपक घाटे यांना दोन दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले आहे. ७२ संस्थांच्या नावे (त्यात एक तर संस्था वा विद्यार्थी बोगस होते) ५ कोटी ५० लाख रुपये नियमबाह्य वाटण्यात आल्याचे आतापर्यंतच्या चौकशीत ामोर आले आहे. हा आकडा आणखी कितीतरी वाढण्याची शक्यता आहे. घाटे, श्रीमती फुले आणि सुनील खामितकर या तीन सहाय्यक आयुक्तांच्या काळात हे घोटाळे घडले. फुले यांना आधीच निलंबित करण्यात आले आहे. खामितकर हे सध्या नांदेड जिल्हा परिषदेचे समाजकल्यण अधिकारी आहेत. दोनच दिवसांपूर्वी आंतरजातीय विवाहितांकडून लाच घेतल्याप्रकरणी त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतेच रंगेहाथ पकडले. घाटे हे सध्या संशोधन अधिकारी, जातपडताळी, मुंबई उपनगर या पदावर होते. शैक्षणिक संस्थेचे नाव आणि अनियमितता झालेली रक्कम कंसामध्ये -१. महात्मा गांधी संगणक व तंत्रशिक्षण कॉलेज, घुग्गुस जि.चंद्रपूर (२६०६५८०), २.स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, चंद्रपूर (६५४८२२५), ३. ग्लोबस कॉलेज आॅफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, चंद्रपूर (११९१५८५), ४. पूजा नर्सिंग स्कूल, परळी जि.बीड (६७८३९५), ५. इंदिरा गांधी स्कूल ता.पाटोदा जि.बीड (२७२२२५), ६. डॉ.डी.एम.धोंडे स्कूल आॅफ नर्सिंग कडा, ता.अष्टी, जि.बीड (२२१३४६) ७. जिजामाता नर्सिंग स्कूल, ता.माजलगाव, जि.बीड (२८०१६०), ८.कै.रघुनाथरावजी केंद्र नर्सिंग स्कूल, परळी वैजनाथ, जि.बीड (एएनएम) (६९९२५), ९. कै.रघुनाथरावजी केंद्र नर्सिंग स्कूल, परळी वैजनाथ, जि.बीड (जीएनएम) (८००००), १०. यशवंत नर्सिंग स्कूल, जि.बीड (११०६५६३), ११.लोकसेवा नर्सिंग स्कूल, जि.बीड (३३१८२५), १२. अंकिता दौंड इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंग, आंबाजोगाई, जि.बीड (३९४३५), १३. ज्ञानदीप कॉलेज आयटीयआय मॅनेजेमेंट, ता.आंबाजोगाई, जि.बीड (१९५९५५), १४. किसान कॉलेज आॅफ आयटीआय अँड अ‍ॅग्रीकल्चर ता.धारूर, जि.बीड (१४८८३६८), १५. माणिकदादा कदम-पाटील संगणक व्यवस्थापनशास्र महाविद्यालय तुळजापूर, जि.उस्मानाबाद (२३११०२३), १६. करिअर इन्स्टिट्यूट आॅफ कॉम्प्युटर अँड आयटी, मादळमोही, ता.गेवराई, जि.बीड (५३८०४४०) १७. अ‍ॅस्पायर कॉलेज आॅफ टेक्नॉलॉजी, एसपी कॉलेज, चंद्रपूर (२२०८२२५), १८. छत्रपती शिवाजी कॉलेज आॅफ टेक्निकल, बाबूपेठ, जि.चंद्रपूर (३४६०६५), १९. एफ.झेड कॉलेज आॅफ कॉम्प्युटर (--), २०. गुरुसाई कॉलेज, विराई रोड, मूल जि.चंद्रपूर (६४४०६१०), २१. चिमूर सायन्स अँड कॉमर्स कॉलेज चिमूर, जि.चंद्रपूर (१५९१७३५), २२.पिंपरी नर्सिंग स्कूल, चिंचवड, पुणे (११४१३०३), २३. बकुळ तांबट इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंग, कर्वे नगर पुणे (१०९८२०७), २४.अश्विनी इन्सिट्यूट आॅफ नर्सिंग, सोलापूर (८१२९५६०), २५. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, कॉलेज आॅफ नर्सिंग, बार्शी, जि.सोलापूर (४४७२९२७), एकूण रक्कम - ४,८३,६३,६२२.