शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

२५ अभियंते, नऊ ठेकेदारांवर गुन्हे

By admin | Updated: August 19, 2016 06:30 IST

मुठा नदीवर बांधण्यात आलेल्या टेमघर धरणाच्या गळती प्रकरणी प्राथमिक चौकशीअंती श्रीनिवास कन्स्ट्रक्शन आणि प्रोग्रेसिव्ह कन्स्ट्रक्शन या दोन ठेकेदार कंपन्यांच्या संचालकांसह तत्कालन

मुंबई : मुठा नदीवर बांधण्यात आलेल्या टेमघर धरणाच्या गळती प्रकरणी प्राथमिक चौकशीअंती श्रीनिवास कन्स्ट्रक्शन आणि प्रोग्रेसिव्ह कन्स्ट्रक्शन या दोन ठेकेदार कंपन्यांच्या संचालकांसह तत्कालन चार कार्यकारी अभियंता, पाच उपअभियंता आणि १६ शाखा अभियंत्यांवर दोषारोप ठेवण्यात आला असून या सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत, अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. संबंधित दोन्ही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात येणार आहे.टेमघर धरणाची मूळ मान्यता ३० जानेवारी १९९४ रोजी दिली गेली होती त्यावेळी त्याची किंमत ७०.५१ कोटी होती. त्यानंतर सुधारित प्रशासकीय मान्यता ३२३.५३ कोटी झाली. यात श्रीनिवास कन्स्ट्रक्शनने मूळ निविदा ४४.०६ कोटीची भरल्याने त्यांना १८ मार्च १९९७ रोजी कामाचे आदेश दिले होते. त्यांच्या काळात निविदेवर झालेला खर्च ६४.७२ कोटी होता, तर प्रोग्रेसिव्ह कन्स्ट्रक्शनने मूळ निविदा ५२.३४ कोटीची भरली होती. त्यांनाही १८ मार्च १९९७ रोजी कामाचे आदेश दिले होते त्यांच्या काळात निविदेवर झालेला खर्च ९८.३८ कोटी होता. त्याशिवाय त्यांना आणखी निविदा दिली गेली, ज्याच्या मूळ निविदेची किंमत ४४.४७ कोटी होती व त्यावर झालेला खर्च ७४.२० कोटी होता.टेमघर प्रकल्पावर एवढा खर्च होऊन देखील या प्रकल्पास गळती लागली. त्यामुळे सरकारने निवृत्त सचिव व्ही. एम. रानडे यांची एक सदस्यीय चौकशी समिती नेमली होती. रानडे समितीने आपला अहवाल सरकारला सादर केला असून त्यात सदोष बांधकामास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर दोषारोप ठेवण्यात आला आहे.चौकशी समितीने दिलेल्या शिफारशीनुसार कंत्राटदाराने बँक हमीपत्राची मूदत वाढवून स्वखर्चाने गळती प्रतिबंधक उपाय योजण्याचे हमीपत्र लिहून घेतले गेले. कामाची संथगती व अपुऱ्या प्रगतीमुळे त्यांना १० टक्के दंडही आकारण्यात आला. त्यांची नावे काळ्या यादीत टाकली गेली. शिवाय, संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय झाल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)सदोष बांधकामास जबाबदार अभियंते..र. वि. जावडेकर, चं. श. देवकर, सु. ल. वैद्य व आ. श्री. मोरे हे चार कार्यकारी अभियंता, तर डी. एस. गोडसे, जे. एन. लोलप, एस. एन. पाटील, आर. बी. गलियाल, एस. ए. पवार हे उपविभागीय अभियंता आणि व्ही. के. लोमटे, व्ही. जी. अत्रे, एस. ए. टिळेकर, व्ही. जी. गंगाथडे, ब. भि. ढेरे, व्ही. आर. शिंदे, आर. आर. ताकवले, टी. ए. देशपांडे, आर. डी. पाटील, डी. एन. रासकर, एस. डी. कोकाटे, ए. व्ही. हुडके, ए. आर. पिंपळोदकर, जे. वाय. सूर्यवंशी, एच. के. धामणकर, य. गो. तंटक या १६ शाखा अभियंत्यांचा समावेश आहे.हे आहेत ठेकेदार : श्रीनिवास कन्स्ट्रक्शनचे डी. श्रीनिवास, डी. व्ही. नायडू, डी. व्ही. रमैया, डी. बाबू, डी. रेणुगोपाल चौधरी, श्रीमती लक्ष्मीकांत तम्मा, व्ही. हेमामालिनी आणि प्रोग्रेसिव्हचे के. सांबा शिवाराव आणि डी. एस. राजेंद्रप्रसाद यांच्याविरुद्ध पुण्यात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.