शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

२४७ उमेदवारांना पाच वर्षे निवडणूक बंदी

By admin | Updated: June 13, 2016 03:09 IST

ग्रामपंचायत निवडणुकीतील खर्चाचा हिशेब न देणाऱ्या सुमारे २४७ उमेदवारांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढविता येणार नाही.

आविष्कार देसाई,

अलिबाग- ग्रामपंचायत निवडणुकीतील खर्चाचा हिशेब न देणाऱ्या सुमारे २४७ उमेदवारांना पुढील पाच वर्षे निवडणूक लढविता येणार नाही. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनामार्फत निर्गमित करण्याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये एप्रिल, आॅगस्ट, आॅक्टोबर आणि डिसेंबर २०१५ या कालावधीत निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकीतील खर्चाचा हिशेब निकाल घोषित झाल्यापासून ३० दिवसांच्या आत जिल्हा प्रशासनाकडे देणे सर्व उमेदवारांना बंधनकारक होते. निकाल जाहीर झाल्यानंतर हिशेब देण्यास विलंब करणाऱ्या सुमारे ५०४ उमेदवारांची यादी प्रशासनाने तयार केली होती. त्यांना नोटीसही पाठविण्यात आली, परंतु प्रशासनाच्या नोटीसला सकारात्मक प्रतिसाद आला नाही. त्यातील काही उमेदवारांनी जिल्हा प्रशासनाला हिशेब विलंबाने दिल्याबाबतचे खुलासे दिले. त्यातील १६६ खुलासे प्रशासनाने मान्य केले आहेत. जिल्हा प्रशासनाला ज्यांनी फाट्यावर मारले त्या २४७ उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले. या प्रकरणातील ९१ अर्ज शिल्लक असल्याचे सूत्रांनी सांगितले. वेळेवर खर्चाचा हिशेब न दिल्याने फार मोठी किंमत चुकवावी लागली आहे. यामध्ये कोणते उमेदवार आहेत त्यांची नावे मात्र समजू शकली नाहीत. >बंदी घातलेल्या उमेदवारांना दिलासा२४७ उमेदवारांना ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात उतरता येणार नसले, तरी त्यांना पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीत संधी प्राप्त होऊ शकते, अशी ग्रामपंचायतीच्या कायद्यामध्ये तरतूद आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीची बंदी घातलेल्या उमेदवारांसाठी या माध्यमातून दिलासा मिळणार आहे. ज्यांना बंदी घालण्यात आली आहे ते कोकण आयुक्तांकडेही दाद मागू शकतात, तोही मार्ग त्यांच्यासाठी खुला आहे.निवडणुका पार पडल्यानंतरची ही नियमितची प्रक्रिया आहे. संबंधितांना आम्ही नोटीस पाठविल्या आहेत ही बाब खरी आहे. खुलासे अमान्य झालेल्यांना यापुढे निवडणूक लढविता येणार नाही.- पी.डी.मलिकनेर, अतिरिक्त जिल्हाधिकारी, रायगड