शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

२३२ लहानग्यांचा कोरोनाने घेतला बळी, तिन्ही लाटांमधील मृत्यूविश्लेषण अहवालातील माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 07:50 IST

राज्याच्या कोरोना मृत्यू विश्लेषण अहवालातील निरीक्षणानुसार, या वयोगटात २,४७,७५७ लहानग्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर या वयोगटात पहिल्या लाटेत ९७, दुसऱ्या लाटेत ११७ आणि तिसऱ्या लाटेत १८ बळींची नोंद झाली आहे. 

मुंबई : कोरोनाच्या सूक्ष्म विषाणूने संपूर्ण जग हादरले. संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात उपचारांची दिशा ठरलेली नव्हती, तर दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. यानंतर लसीकरण सुरू झाल्याने अन् संसर्गाची तीव्रता कमी झाल्याने सुटकेचा निःश्वास सोडला. परंतु, कोरोनाच्या या तीन लाटांमध्ये १ ते १० वर्षांमधील २३२ लहानग्यांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे.राज्याच्या कोरोना मृत्यू विश्लेषण अहवालातील निरीक्षणानुसार, या वयोगटात २,४७,७५७ लहानग्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर या वयोगटात पहिल्या लाटेत ९७, दुसऱ्या लाटेत ११७ आणि तिसऱ्या लाटेत १८ बळींची नोंद झाली आहे. याखेरीज, देशातील कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु, या लाटेत लहानग्यांना संसर्ग कमी झाल्याचे समोर आले आहे. यामुळे पालक तसेच  डॉक्टरांनी सुटकेच्या निश्वास सोडल्याचे दिसून आले.

 या कारणामुळे कोरोना मृत्यूंत वाढ - केंद्रीय आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार, कोरोना रुग्णांचा सहव्याधीमुळे मृत्यू ओढवल्यास या रुग्णांच्या मृ्त्यूंची नोंद कोरोनाबाधित म्हणून करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ही प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे पहिल्या लाटेत १९००, दुसऱ्या लाटेत २६०० रुग्णांचे मृत्यू वाढले आहेत. तिसऱ्या लाटेच्या नोंदीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 

मृत्यू विश्लेषणाने विषाणूचा सखोल अभ्यासकोरोना वा सहव्याधींमुळे झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचा अभ्यास सातत्याने करण्यात येत आहे. यामुळे कोरोनासारख्या सूक्ष्म विषाणूचा सखोल अभ्यास करता येईल. शिवाय, यामुळे संशोधनाच्या व अभ्यासाच्या दृष्टीने हे काम सोपे होईल.- डॉ. अविनाश सुपे, कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख

 १- १० वयोगट  कालावधी      रुग्ण     मृत्यूपहिली लाट     ६७११०    ९७दुसरी लाट     १४६२९८    ११७तिसरी लाट     ३४३४९    १८ एकूण    २४७७५७    २३२ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस