शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

राज्यातील २३ धरणांमधून विसर्ग! अमरावती, नागपूर मात्र अजूनही तहानलेलेच

By अतुल कुलकर्णी | Updated: September 20, 2017 17:05 IST

राज्यात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. महत्वाच्या धरणांमधे मोठ्या प्रमाणावर पाणी साठा वाढत आहे, त्यामुळे ३७ पैकी २३ धरणांमधून पाणी सोडणे सुरु झाले आहे.

मुंबई, दि. 20 - राज्यात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. महत्वाच्या धरणांमधे मोठ्या प्रमाणावर पाणी साठा वाढत आहे, त्यामुळे ३७ पैकी २३ धरणांमधून पाणी सोडणे सुरु झाले आहे. पुणे विभागातील १८ पैकी १६ धरणातून पाणी सोडणे सुरु झाले असून खडकवासला आणि वाणरेतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी लोकमतशी बोलताना दिली.

बुधवार दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून निरा देवघर सांडव्याचे पाच दरवाजे उघडण्यात आले असून ३६४० व पावरहाऊस मधून ७५० असे एकूण ४३९० क्यूसेक्स पाणी नीरा नदीत सोडले जात आहे. त्याशिवाय वाडीवलेमधून १३७, भाटघरमधून २१६७ आणि मुळशीमधून ७००० क्यूसेक्स पाणी सोडले जात असल्याचे ते म्हणाले.

बुधवारी मंत्रालयात जलसंपदा विभागाच्या काही बैठका लावण्यात आल्या होत्या मात्र राज्यभर मोठ्या पावसाचा इशारा असल्यामुळे सगळ्या बैठका रद्द करण्यात आल्याचे व अधिकाºयांना धरण परिसरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

एरव्ही आमच्या धरणातून पाणी सोडू दिले जाणार नाही अशी ताठर भूमिका घेणा-या राजकारणी आणि त्या भागातील लोक आपापल्या भागातली भरलेली धरणं पाहून खूष आहेत आणि पाणी सोडले जात असल्याचे पाहून गावागावात चर्चेला उधाण आले आहे. मात्र मराठवाडा आणि नागपूर विभागातील एकाही धरणातून पाणी सोडण्यासारखी स्थीती नाही असेही मंत्री महाजन म्हणाले.

तर जायकवाडी आणि कोयनेचे दरवाजे उघडणार

गेल्या अनेक वर्षापासून पाण्यामुळे तहानलेल्या जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी येणे सुरु झाले आहे. जायकवाडीच्या वरती असणाºया सगळ्या धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु असल्यामुळे २१७१ दलघमी क्षमता असलेल्या या धरणात आजमितीला १९२५.३० दलघमी पाणी साठा जमा झाला आहे. हा साठा २१७१ च्या वरती गेला तर जायकवाडीचे दरवाजे उघडावे लागतील. तर कोयनेची क्षमता २८२६ दलघमी ची आहे तेथे आज या क्षणी २८०४.८६ दलघमी पाणी साठा आहे. ज्याक्षणी ही पातळी ओलांडली जाईल त्यावेळी कोयनेचेही दरवाजे उघडण्याची वेळ येईल असेही गिरीष महाजन म्हणाले.

कोठून किती पाणी सोडणे सुरु झाले आहे?

धरणाचे नाव जिल्हा प्रती क्यूबिक मिटर पर सेकंद

कोकण विभाग...

सूर्या धामणी ठाणे १५८

भातसा ठाणे १३५.७५

वैतरणा नाशिक ४१.३३

नाशिक विभाग...

दारणा नाशिक १२२.२९

गंगापूर नाशिक ६२.६३

भंडारदरा अहमदनगर ९०.९५

हतनूर जळगाव २७६

पुणे विभाग...

पानशेत पुणे ४५.३१

वरसगाव पुणे ११७

खडकवासला पुणे ६८४.८१

पवना पुणे ४०.३५

चासकमान पुणे १२८.४२

घोड पुणे ४९.८४

नीरा देवधर पुणे २०३.५४

भाटघर पुणे ६१.३६

वीर सातारा ४४२.१४

कृष्णा धोम सातारा ७.०८

कृष्णा कण्हेर सातारा १४४.६४

धोम बलकवडी सातारा ६४.००

भीमा उजनी सोलापूर ६७१.१०

वारणा सांगली ६६६.८०

दूधगंगा कोल्हापूर १७६

राधानगरी कोल्हापूर १८३.६०