शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेत २२ लोकांचे बळी गेले आणि मुंबई पोलिसांनी माणुसकीचाही बळी घेतला!

By अतुल कुलकर्णी | Updated: September 29, 2017 17:54 IST

एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेत २२ लोकांचे बळी गेले. मात्र या घटनेत माणुसकीचाही बळी गेला. मुंबई पोलिसांनी त्यांच्यातल्या उरल्या सुरल्या माणुसकीला मूठमाती देऊन त्यावर स्वत:च्या पराक्रमाचा झेंडाच लावलाय.

मुंबई- एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेत २२ लोकांचे बळी गेले. मात्र या घटनेत माणुसकीचाही बळी गेला. मुंबई पोलिसांनी त्यांच्यातल्या उरल्या सुरल्या माणुसकीला मूठमाती देऊन त्यावर स्वत:च्या पराक्रमाचा झेंडाच लावलाय. जे २२ लोक मेले त्यांच्या कपाळावर १ ते २२ असे नंबर लिहिण्याचे शौर्यकाम मुंबई पोलिसांनी केले आहे. विशेष म्हणजे मृतांचे कपाळावर नंबर लिहिलेले हे फोटो पोलिसांनी रिलीज केले आहेत. जनाचीही नाही आणि मनाचीही नाही, आम्हाला लाजच उरली नाही...! 

या मृतांमध्ये जर तुमचे कोणी नातेवाईक असते, कोणाची आई असती, कोणाची बहीण असती तर तुम्ही त्यांच्या कपाळावर नंबर लिहिण्याची हिंमत केली असती का ? २२ मृतदेह होते. त्यांच्या नातेवाईकांनी चेह-यावरूनही ते ओळखले असते. त्यासाठी त्यांच्या कपाळावर नंबर लिहून त्या मृतदेहांची विटंबना करण्याची हिंमत पोलिसांची झालीच कशी? ज्यांनी कोणी हे केले त्याची वर्दी तातडीने काढून घेतली पाहिजे. नियतीनेच ज्यांच्या कपाळी असा दुर्दैवी मृत्यू लिहिला त्यांच्या कपाळावर ते मेल्यावर असा नंबर लिहून विटंबना करण्याची कल्पना तरी पोलिसांच्या मनात कशी येऊ शकते. 

इतके कसे आम्ही असंवेदनशील झालोय. अशा कशा आमच्या भावना बोथट झाल्या आहेत. मुंबईत माणसं किड्यामुंग्यांसारखी चिरडून मरतात आणि आम्हाला त्याचे काहीच वाटत नाही... हे सगळं अत्यंत भयंकर आहे. हा फोटो पाहिला आणि प्रचंड संताप झालाय. प्रयत्न करूनही हे लिहिण्यासाठी सभ्य शब्द सापडत नाहीत. एवढे हे सगळे टोकाचे दुर्दैवी प्रकरण आहे.

माणसांच्या जीवाची काहीच किंमत उरलेली नाही का? जे मेले त्यांचे मृतदेह जर ओळीने पांढ-या कपड्यात गुंडाळून ठेवले असते आणि त्यांचे फोटो रिलीज केले असते तर मुंबई पोलिसांच्या संवेदनशिलतेचे दर्शन घडले असते पण हे घडले नाही. वेड लागलेला माणूसच ही असली कृती करु शकतो. वेळ गेलेली नाही, चुका सुधारता येतात, आता तरी ते कपाळावरचे नंबर पुसून ते मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात द्या. झालेल्या चुकीबद्दल सपशेल दिलगीर व्यक्त करा, आणि ज्यांनी कोणी हे केले असेल त्याच्यावर कठोर कारवाई करा. एवढी तरी अपेक्षा मुंबई पोलिसांकडून करू शकतो की नाही.

दुसरी माणुसकीशून्य गोष्ट खा. किरीट सोमय्या यांनी करुन दाखवली. जे मेले त्याबद्दल बोलायचे सोडून हे महाशय म्हणाले, काँग्रेसनेच गेल्या अनेक वर्षात पूल बांधला नाही म्हणून ही घटना घडली. शिवाय जे जीवानिशी गेले त्यांना रेल्वेकडून, राज्यसरकारकडून आणि केंद्राकडून किती पैसे मदत मिळणार आहे याचा हिशोब करुन ते माध्यमांना सांगत होते. किरीट सोमय्याजी, अहो तुमचे पैसे मिळणार म्हणून का कोणी चेंगरुन मरतं का हो...! जरा तरी तारतम्य बाळगा... यापेक्षा जास्त काय सांगावे तुम्हाला...?