शहरं
Join us  
Trending Stories
1
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
2
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
3
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
4
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
5
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
6
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
7
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
8
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
9
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
10
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
11
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
12
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
13
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
14
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
15
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
16
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
17
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
18
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
19
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
20
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...

साधकाच्या घरात २२ बॉम्बसह स्फोटकांचा साठा; मुंबई एटीएसने उधळला घातपाताचा मोठा कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 06:49 IST

‘सनातन संस्था’ तसेच हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असलेल्या वैभव राऊत याच्या नालासोपाऱ्यातील घरातून २२ गावठी बॉम्ब, डिटोनेटर आणि बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले

मुंबई/नालासोपारा : ‘सनातन संस्था’ तसेच हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित असलेल्या वैभव राऊत याच्या नालासोपाऱ्यातील घरातून २२ गावठी बॉम्ब, डिटोनेटर आणि बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले असून, राऊत, शरद कळसकर व सुधन्वा गोंधळेकर या हिंदुत्वावादी कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस)ही कारवाई करत, राज्यात सणासुदीच्या दिवसात घातपात घडवून आणण्याचा मोठा कट उधळून लावला.पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासात राऊतचे नाव समोर आल्याने त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली होती. पुरेशी माहिती मिळताच मध्यरात्री घरावर छापा टाकून त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी दोन जणांना एटीएसने शुक्रवारी अटक केली. त्यातील शरद कळसकर हा नालासोपाºयाचा, तर सुधन्वा गोंधळेकर हा पुण्याचा आहे. हे दोघेही राऊतच्या संपर्कात होते. गावठी बॉम्ब बनविण्यासाठी दोघांनी राऊत याला मदत केल्याचे एटीएसच्या सूत्रांचे म्हणणे आहे. तिघांनाही विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता १८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.नालासोपारा पश्चिमेकडील सोपारा गावात असलेल्या भंडार आळी परिसरात राऊत आई, पत्नी आणि मुलांसोबत राहात होता. गुरुवारी रात्री एटीएसने त्याच्या घरावर छापा टाकला. तेव्हा घरातून आठ गावठी बॉम्ब, डिटोनेटर्स आणि बॉम्ब तयार करण्यासाठी लागणारी गन पावडर असे साहित्य सापडले. राऊतच्या घराजवळील दुकानातूनही गन पावडर आणि डिटोनेटर्स जप्त करण्यात आले. हे छापासत्र शुक्रवार सकाळपर्यंत सुरू होते. बॉम्बसोबतच लॅपटॉप आणि अन्य वस्तूही एटीएसने जप्त केल्या आहेत. श्वान पथकाच्या आधारे माग काढत परिसर पिंजून काढण्यात आला. तसेच काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली. फॉरेन्सिकची टीम यावेळी घटनास्थळी होती. जप्त केलेले साहित्य तपासणीसाठी नालासोपाºयाहून मुंबईला पाठविण्यात आले. नंतर वैभवला एटीएसने चौकशीसाठी मुंबईच्या कार्यालयात नेले. तेथे त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे पुण्यातून गोंधळेकर आणि नालासोपाºयातून कळसकरला ताब्यात घेण्यात आले. त्यांची समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आल्यावर त्या दोघांनाही अटक करण्यात आली. एवढ्या मोठया प्रमाणात स्फोटके का गोळा केली होती, बॉम्ब कोणी तयार केले, कशासाठी केले, याची माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे एटीएसच्या अधिकाºयांनी नंतर पत्रकार परिषदेत सांगितले. राऊतविरूद्ध आधीही नालासोपारा परिसरात किरकोळ स्वरूपाच्या दोन गुन्ह्यांची नोंद असल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.गुप्तचरांची पाळतसनातनच्या पनवेलजवळच्या आश्रमावर गुप्तचरांची पाळत होती. तेथे कोण येते, किती वेळ थांबते, सोबत येताना कोण येते, जाताना कोणासोबत जाते, कोण थांबते, किती वेळ थांबते याची माहिती घेताघेता वैभव राऊतचा सनातनच्या या आश्रमातील वावर ठळकपणे लक्षात आला. त्यातूनच पुढे त्याच्या बंगल्यावर पाळत ठेवण्यात आली. तेव्हा रात्रीच्या वेळी अनेक व्यक्ती त्याच्या बंगल्यावर येतात. बराच वेळ थांबतात आणि मध्यरात्री किंवा पहाटे बाहेर पडतात, असे आढळून आले. त्यामुळे त्याच्यावरील संशय वाढत गेला. त्यातूनच त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला.‘हा त्रास देण्याचा प्रकार’राऊतच्या हिंदुत्त्ववादी संघटनांशी असलेल्या संबंधाबाबत विचारता हिंदु जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी सांगितले, ‘नालासोपारा येथून वैभव राऊतला अटक झाली. तो सनातन संस्थेचे साधक असल्याचा उल्लेख होत आहे. तो गोरक्षक असून ‘हिंदू गोवंश रक्षा समिती’ या गोरक्षण करणाºया संघटनेच्या माध्यमातून कार्यरत होता. तो हिंदू जनजागृती समितीमार्फत हिंदू एकत्रीकरणाच्या उपक्रमांमध्ये, तसेच आंदोलनांमध्ये सहभागी होत असे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांचा कोणत्याही उपक्रमात सहभाग नव्हता. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना त्रास देणे, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणे यासारख्या घटना आता नवीन नाहीत.’सनातनशी संबंधांचा तपास सुरूवैभव राऊत हा सनातन संघटनेचा कार्यकर्ता आहेत का? याची चौकशी पोलीस करत आहेत. त्याने स्फोटके कुठून आणि कशासाठी आणली आहेत? याची माहिती एटीएस योग्यवेळी जाहीर करणार आहे. याप्रकरणी एटीएसचे डीआयजी सुवेज हक यांच्याशी संपर्क साधता, तपास सुरु असून लवकरच उर्वरित माहिती लवकरच देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.सनातनवर बंदी घाला : मलिकएटीएसने सनातनचा साधक वैभव राऊतला अटक केली असून त्याच्या घरात बॉम्ब आणि बॉम्ब तयार करण्याचे साहित्यही सापडले आहे. यावरुन सनातन संस्था दहशतवादी कारवाया करत असल्याचे स्पष्ट होते, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. आमच्या सरकारने या संस्थेवर बंदी घालण्याची वारंवार मागणी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. सनातन संस्थेला गोवा आणि महाराष्ट्र सरकारचा राजाश्रय मिळत आहे, असा आरोपही त्यांनी केला. सरकारने हा विषय गांभीर्याने घेत संस्थेवर बंदी घालण्यासाठी केंद्राकडे शिफारस करावी, अशी मागणी त्यांनी केली.७ आॅगस्टला लागली होती कुणकुणवैभव राऊत याच्या घरात व दुकानात गावठी बॉम्ब आणि ते बनविण्याचे साहित्य असल्याची माहिती एटीएसला ७ आॅगस्टला मिळाली होती. त्यामुळे पाळत ठेवून गुरुवारी रात्री घरावर व दुकानावर छापा टाकल्याची माहिती एटीएसच्या अधिकाºयांनी विशेष सत्र न्यायालयात दिली. वैभवच्या घरातून २२ गावठी बॉम्ब जप्त करण्यात आाले. त्याचबरोबर ५० बॉम्ब तयार होतील, एवढे बॉम्ब तयार करण्याचे साहित्यही जप्त केले.त्याच्या घरात एक चिठ्ठी मिळाली. या चिठ्ठीत बॉम्ब कसा बनवायचा, याची सविस्तर माहिती होती. त्यामुळे हे बॉम्ब कशासाठी बनविण्यात आले, आरोपींना बॉम्ब बनविण्याची माहिती कुठून मिळाली, आरोपी कोणत्या दहशतवादी संघटनेशी निगडीत आहेत आणि त्यांना बॉम्ब बनविण्याचे साहित्य कोणी पुरविले, याबाबत आरोपींची चौकशी करायची असल्याने आरोपींना १५ दिवस एटीएस कोठडी देण्यात यावी, अशी विनंती एटीएसच्या वकिलांनी न्यायालयाला केली. वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांचा ताबा १५ दिवस द्यावा, अशी विनंती एटीएसने विशेष न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने एटीएसला आरोपींचा ताबा १८ आॅगस्टपर्यंत दिला.एटीएसने मारहाण केली, अशी तक्रार आरोपींनी न्यायालयात केली. त्यावर न्यायालयाने या तिघांचीही वैद्यकीय तपासणी करून १३ आॅगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. आरोपींच्या वकिलांनी तिघांना या प्रकरणात नाहक गोवण्यात येत असल्याचा दावा न्यायालयात केला.>विविध साहित्य हस्तगतगावठी बॉम्बसह दोन जिलेटीन कांड्या, ४ इलेक्ट्रॉनिक आणि २२ नॉन इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर्स, १५० ग्रॅम स्फोटक पावडर, बॅटरी, सोल्ड्रिंग मशीन, बॉम्ब सर्किट ड्रॉइंग तसेच पॉयझन असे लिहिलेल्या दोन बाटल्या त्याच्याकडून हस्तगत करण्यात आल्याचे असे एटीएस प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले. कळसकर हा खासगी कंपनीत काम करतो, तर गोंधळेकरचा व्यवसाय आहे. राऊत हा इस्टेट एजंट आहे.दरम्यान, राऊत यांचे वकील पुनाळेकर यांनी बीफ माफियांकडून लाच घेऊन गोवंश वाचवणाºयांना अडकवण्याचे हे षडयंत्र असल्याचा दावा वृत्तवाहिन्यांशी बोलताना केला.>अशी माहिती लागली हातीगौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक केलेल्या अमोल काळे याने या हत्येशी संबंधित ज्या दहा व्यक्तींची नावे घेतली होती; त्यात वैभव राऊतचे नावही होते. तेव्हापासून एटीएसची त्याच्यावर नजर होती. त्यातूनच त्याच्यावर पाळत ठेवली गेली आणि घरावर छापा टाकला गेला. २०१५मध्ये त्याच्याविरोधात दोन गुन्हे दाखल आहेत. काही दिवसांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आला होता.सुधन्वा गोंधळेकरहा पुण्याचा आहे. त्यानेही राऊत याला मदत केल्याचे एटीएसच्या सूत्रांचे म्हणणे आहे.>कोण आहे वैभव राऊत?उच्चशिक्षित असलेला वैभव राऊत (४०) हा नालासोपाराचा रहिवासी आहे. त्याचा २०१२पासून हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित कार्यक्रमांत सक्रिय सहभाग आहे. वसई भागातील हिंदू एकतेच्या चळवळीतही तो सहभागी होता. सनातन संस्थेशी संलग्न हिंदू गोवंश रक्षा समितीचे कामही तो करीत असे. हिंदू राष्ट्रासाठी होणाऱ्या हिंदू एकता दिंडीत त्याचा सहभाग होता. मशिदींवरचे ध्वनिक्षेपक उतरवण्याच्या मागणीसाठी तो कार्यरत होता. महिला आणि तरुणांना तो आत्मरक्षणाचे प्रशिक्षण देत असे.सनातनचे स्पष्टीकरणवैभव राऊत सनातनचा साधक नाही; मात्र हिंदुत्ववादी संघटनांच्या अनेक आंदोलनांमध्ये त्याचा सहभाग असे. हिंदुत्वासाठी कार्य करणारा कोणताही हिंदू कार्यकर्ता सनातनचाच आहे, असा खुलासा सनातन संस्थेचे प्रवक्ता चेतन राजहंस यांनी केला.>तपासानंतर सत्य कळेल : गृहराज्यमंत्रीवैभवचा सनातनशी संबंध आहे की नाही हे अजून सिद्ध झाले नाही, तपासानंतर सत्य समोर येईल, अशी माहिती गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी दिली.>बकरी ईदला बॉम्बस्फोट घडविण्याचा घटयेत्या बकरी ईदला बॉम्बस्फोट घडवून मोठा हिंसाचार घडविण्याचा कट्टरतावाद्यांचा कट नालासोपारा येथे सापडलेल्या स्फोटकांमुळे उघड झाला आहे. आता तरी राज्य सरकारे सनातन आणि हिंदू जनजागृती समितीसारख्या बंदी घालणार का?- राधाकृष्ण विखे-पाटील, विधानसभेतील विरोधी पक्षनेते>सनातनला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करासनातन संस्थेच्या एका साधकाच्या घरातून दहशतवादविरोधी पथकाने स्फोटके जप्त केली. यावरून सनातन संस्था मोठा घातपात करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे सनातनला दहशतवादी संघटना म्हणून घोषीत करावे.- खासदार अशोक चव्हाण,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

 

टॅग्स :MumbaiमुंबईAnti Terrorist Squadदहशतवाद विरोधी पथक