शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

२१वे शतक हे बुद्धिमत्तेचे

By admin | Updated: May 21, 2015 00:45 IST

डी. बी. शेकटकर : भारतीय सैन्य सुसज्ज, सामर्थ्यशाली

इचलकरंजी : आपल्या देशाच्या आणि जागतिक पातळीवर पाहिले, तर १९ वे शतक हे मसल पॉवरचे होते. २० वे शतक हे मनी पॉवरचे, तर आजचे २१ वे शतक हे नॉलेज पॉवरचे आणि बुद्धिमत्तेचे आहे. आमचा युवावर्ग जितका बुद्धिवान होईल, तितका तो संपन्न होऊ शकेल, असे उद्गार निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर यांनी काढले.एकविसाव्या शतकातील ‘आतंकवाद’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, केवळ आतंकवादी संपवून उपयोग नाही, तर आतंकवाद संपायला हवा, तरच जगात अधिक शांतता प्रस्थापित होईल. आतंकवाद थांबविण्यासाठी प्रत्येक घरात, समाजात जागरूकता हवी. घराघरांत मानवतावाद आणि नीतिमूल्यांची जपणूक होणे आवश्यक आहे, असे झाले तरच विद्यार्थी आणि युवक वर्ग वाईट मार्गाकडे वळणार नाही. येथील मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत त्यांनी विचार मांडले.आपल्या भाषणात पाकिस्तान व चीनबद्दल बोलताना त्यांनी, पाकिस्तान शस्त्र सज्जतेत आपल्यापेक्षा कमी असल्याने आपल्यावर आतंकवाद थोपवत आहे; पण त्यांच्या प्रत्येक प्रांतात अंतर्गत वाद असल्याने प्रचंड हिंसाचार आहे आणि त्याची फळे त्यांना भोगावी लागत आहेत. चीन आज विकसित असला, तरी तिथेही मोठी विषमता आहे. त्यांनाही आतंकवादाची समस्या आहे. चीन युद्ध करून आपला भूभाग बळकाऊ शकणार नाही आणि आपले सैन्यही तसे होऊ देणार नाही, असे उद्गार त्यांनी काढले.आपल्या भाषणात छत्रपती शिवरायांचा महान युद्ध नेतृत्व, असा गौरवपर उल्लेख शेकटकर यांनी केला. आपले सैन्य पूर्णपणे सक्षम असून, जगातील २९ देशांत आज भारतीय सैन्य शांततेसाठी कार्य करीत असल्याची माहिती त्यांनी दिली. मनोरंजन मंडळाचे दिनेश कुलकर्णी आणि यतिराज भंडारी यांनी स्वागत केले. प्रा. समीर गावंडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)