शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत ४२० मजुरांच्या नावावर उचलले २१ कोटी, त्रिधारा शुगर्सचा प्रताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 06:29 IST

परभणी तालुक्यातील आमडापूर येथील त्रिधारा शुगर्स कारखान्याने ४२० मजुरांच्या नावावर प्रत्येकी ३ लाख रुपयांचे कर्ज उचलून २० कोटी ८० लाखांचा अपहार केल्याचे प्रकरण समोर आले आहे.

विजय चोरडिया जिंतूर (जि. परभणी) : परभणी तालुक्यातील आमडापूर येथील त्रिधारा शुगर्स कारखान्याने ४२० मजुरांच्या नावावर प्रत्येकी ३ लाख रुपयांचे कर्ज उचलून २० कोटी ८० लाखांचा अपहार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. यापूर्वी गंगाखेड येथील एका खासगी साखर कारखान्याने शेतकºयांच्या नावे असेच कर्ज परस्पर उचलले आहे.त्रिधारा साखर कारखान्याचे संचालक तहसीन अहेमद खान यांनी कारखान्यामध्ये काम देण्याचे अमिष दाखवून तर कुणाला कारखान्याचे सभासद करून घेतो, असे म्हणत मजुरांच्या कर्ज मागणीपत्रावर स्वाक्षºया घेतल्या. त्या आधारे जवळा बाजार येथील ( जि. हिंगोली) भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतून प्रत्येक मजुरांच्या नावे ३ लाख रुपयांचे कर्ज उचलले. बँकेने कर्ज वसुलीसाठी वकिलामार्फत मजुरांना नोटिसा पाठविल्या. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. संचालक तहसीन अहेमद खान यांनी जवळा बाजार येथील बँकेला मजुरांना ऊस तोडणीसाठी बैलगाडी खरेदी, बैलगाडी दुरुस्ती, मजुर भरती, ऊस वाहतूक आदींसाठी म्हणून कागदपत्रे दिली होती. या आधारेच बँकेने १० आॅक्टोबर २०१३ रोजी एकाच वेळी सर्वांच्या खात्यावर कर्ज जमा केले. जवळा बाजार येथील भारतीय स्टेट बँकेने कर्जदाराची परतफेड करण्याची क्षमता, कर्ज हमी व कार्यक्षेत्र न पाहता कारखान्याचे मजूर असलेले दाखवित कर्ज वाटप केले. यामध्ये परभणीसह, नांदेड, बीड, औरंगाबाद, लातूर, वाशीम आदी जिल्ह्यातील मजुरांना बैलगाडी खरेदी, ट्रॅक्टर दुरुस्तीसाठी कर्ज दिले. कर्ज देत असताना कारखान्याने बँकेला मालमत्ता गहाण ठेवली. बँकेने कर्ज देताना कामगारांची मजुरी त्यातून कर्जाचे हप्ते, फेडण्यास किती रक्कम भरेल? याचे ताळेबंद कारखान्याकडून घेतले. कामगारांच्या कुटुंबाला लागणारा नियमित खर्च प्रती दिन १५० रुपये धरला, तर कामगाराकडून व्याजासहीत दरमहा ३ हजार ५१० रुपये हप्ता म्हणून सहज वसुली होऊ शकते, असा करारनामा बँकेने लिहून घेतला.तडजोडीचे प्रयत्न सुरूयासंदर्भात भारतीय स्टेट बँकेच्या जवळा बाजार शाखेचे प्रभारी व्यवस्थापक प्रकाश मुकाडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, त्रिधारा शुगरच्या अनुषंगाने न्यायालयामध्ये खटला सुरु आहे. शिवाय वरिष्ठ पातळीवर तडजोडीचे प्रयत्न सुरु आहेत. थकित कर्जाची रक्कम भरण्याबाबत वन टाईम सेटलमेंट स्कीम अंतर्गत ज्या शेतकºयांच्या नावे कर्ज आहे, त्यांना बँकेच्या वतीने कर्ज भरण्याबाबत नोटिसा दिल्या आहेत.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचार